पुढच्या वर्षी पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. पंरतु, जेव्हापासून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे, तेव्हापासून विविध कारणांमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी चर्चेच आहे. अशातच पाकिस्तानचा महिला संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता. त्या हॉटेलमध्ये भयंकर आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमान पदावरून पाकिस्तानच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
कराचीमध्ये सध्या National Women’s ODI चॅम्पियनशीप सुरू आहे. यासाठी पाकिस्तानचा संघ कराचीमधील एका हॉटेलमध्ये थांबला होता. मात्र, याच दरम्यान हॉटेलमध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत हॉटेलचे नुकसान झाले आहे. यावेळी हॉटेलमध्ये पाच महिला खेळाडू होत्या. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, या आगीत महिला खेळाडूंच्या काही सामानाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पीसीबीने कराचीमध्ये सुरू असलेली नॅशनल वनडे टुर्नामेंट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोठ्या दुर्घटनेमुळे पाकिस्तानात खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तामध्ये करण्यात येणार आहे. मात्र, या दुर्घटनेमुळे पाकिस्तानचे यजमानपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.