Published on
:
22 Nov 2024, 10:19 am
Updated on
:
22 Nov 2024, 10:19 am
ठाणे : शहर लोकसभा मतदारसंघात दोन वेळा भाजपचे आमदार असलेले संजय केळकर हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर 2009 मध्ये ठाण्यातून विधानसभेवर आमदार म्हणून आमदार म्हणून निवडून गेलेले आणि त्यांनतर दोन वेळा खासदार राहिलेले राजन विचारे यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. या मतदारसंघात 59 टक्के मतदान झाले आहे.
लोकसभेपेक्षा जवळपास 7 ते 8 टक्के मतदान वाढले आहे. या मतदारसंघाचा 1990 पासूनचा इतिहास पहिला तर शिवसेनचे पहिले आमदार मो. दा. जोशी हे 1990 ते 2004 असे तीन टर्म आमदार राहिले होते. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमदार झाले ते ठाण्यातून. त्यांनतर 2009 ला राजन विचारे हे या मतदारसंघाचे आमदार राहिले. 2014 व 2019 या काळात संजय केळकर हे 10 वर्ष भाजपचे आमदार आहेत. आताच्या निवडणुकीत केळकर विरुद्ध विचारे हे आमने सामने आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी निवडणुकीत रंग भरल्यामुळे ही निवडणूक आणखीनच रंगातदार झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे शहर हा मतदारसंघ शहरी आणि उच्चभ्रू लोकवस्ती असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात मोठया प्रमाणात ब्राम्हण आणि मराठा मतदार आहेत. केळकर हे पूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार राहिलेले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केळकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. तर ठाण्यात राजन विचारे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः ठाण्यात येऊन सभा घेतली. तर मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासाठी राज ठाकरे यांनी दोन वेळा सभा घेतल्या. ठाणे शहरात 3 लाख 78 हजार एवढे एकूण मतदार आहेत. त्यापैकी 59 टक्के म्हणजे 2 लाझ 10 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 80 हजार एवढी मते मिळवणारा उमेदवार विजयी होण्याची चिन्हे आहेत. मागील विधानसभेला संजय केळकर यांना 92 हजार तर अविनाश जाधव यांना 72 हजार मते मिळाली होती. मात्र यावेळी दुरंगी लढत झाली होती. तर 2014 मध्ये संजय केळकर यांना 70 हजार 884 तर रवींद्र फाटक यांना 58 हजार 296 तर निरंजन डावखरे यांना 24 हजार 203 मते मिळाली होती. यंदाही 2014 प्रमाणेच तिरंगी लढत आहे.