Published on
:
25 Nov 2024, 6:17 am
Updated on
:
25 Nov 2024, 6:17 am
पालघर : नविंद शेरख
मागील निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारल्या नंतर झालेल्या चुका चुरुस्त करीत २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेच्या तिकीटावर मैदानात उतरलेल्या विलास तरे यांनी जोरदार मुसंडी मारत बहुजन विकास आघाडीचे नामदार राजेश पाटील यांना ४४ हजार ४५५ भर भकम मतांनी मात देत मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची परतफेड केली.
लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ हेमंत सवय यांना बोईसर विधानसभा मतदार संघाजून ३९ हजार १४८ मतांची आघाडी मिळाल्या नंतर बहुजन विकास आघाडीसाठी धोक्याचा अलार्म चाजला होता परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजेश पाटील यांनी कोणताही घड़ा घेत कोणत्याही सुधारणा केल्या नसल्याचे दिसून आले. प्रचाराच्या शेवटच्या क्षणी राजेश पाटील यांच्या विजयासाठी बहुजन विकास आपाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या सह ठाकूर परिवाराने मोठा जोर लावूनही काही उपयोग झाला नाही, यावेळी बोईसर विधानसभा मतदार संघात झालेली मत विभागणी विलास तरे पांख्या फायद्याची ठरताना दिसली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पालघर तालुक्यात मागे असलेले आमदार राजेश पाटील यांनी पालघर तालुक्यातील पक्ष संघटना वाढवण्याकडे दुर्लक्ष केले. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन विकास आघाडी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मनोर, सफाळे पट्ट्यात मागे जात असताना आमदारांनी बालेकिल्ला राखण्यासाठी कोणतेही परिश्रम घेतले नाही.
वाढीव मतांचा विलास तरेंना फायदा
सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडनुकीत बोईसर विधानसभा मतदार संघात झालेल्या एकूण मतदाना पेक्ष पेक्षा यावेळच्या विधानसभा निवडनुफीत २९ हजार १९६ मतांची वाढ झाली होती. यावेळी झालेले वाढीव गतदान विलास तरे यांना फायद्याचे ठरले. लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ हेमंत सवरा यांना मिळालेली एक लागा चार हजार ४३९, मते टिकवून ठेवत २१ हजार ६७८ मतांची भर घालण्यात विलास हरे यांना यश आले.
विलास तरेनी लोकसभा निवडणुकीतील आघाडी टिकवली
लोकसभा निवडनुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले आमदार राजेश पाटील यांना बोईसर विधानसभा मतदार संभालूत ६५ हजार २९१ मते मिळाली होती. २०१९ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत लोकसभेच्या निवडणुकीत १३ हजार ४१२ मतांनी पिछाडीवर गेले होते. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ८१ हजार ६६२ मते मिळवली २०१९ विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या मतांपेक्षा दोन हजार ९५९ मते अधिक मिळवली.