पुण्यात AI संचलित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर:गुन्हेगार दिसला की पोलिसांना मिळणार अलर्ट, 433 कोटींच्या निधीस मंजुरी

2 hours ago 1
पुणे शहर परिसरात गुन्हे करणार्‍या तसेच वॉन्टेड असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी शहरात आता लवकरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) चलित कॅमेर्‍यांसाठी 433 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये एआय आधारित असलेल्या फेस रेकग्नायझेशन यंत्रणेमुळे शहरात दाखल झालेल्या सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच, गुन्हेगारांच्या संशयित हालचालींवर देखील यामुळे पाळत ठेवली जाणार आहे. यासाठी निधी मंजुर झाल्यामुळे कंत्राटदारांच्या माध्यमातून तात्काळ ही सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रीया सुरू करण्यात येणार आहे. शहरात असे आधुनिक कॅमेरे व इतर अत्याधुनिकरणासाठी शासनाकडून 435 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शहरात यापूर्वी बसविण्यात आलेले 1300 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नवीन मंजूर झालेले 2 हजार 886 आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित कॅमेरे यामुळे सीसीटिव्हीे कॅमेर्‍यांचे जाळे अधिकच मजबुत होणार आहे. शहरात यापूर्वी बसविण्यात आलेले कॅमेरेही या एआय धर्तीवर अपग्रेड केले जाणार आहेत. या माध्यमातून शहर, राज्यासह देशभरात वॉन्टेड असलेल्या आरोपींना ओळखणे शक्य होणार आहे. या आधुनिक कॅमेर्‍यांच्या माध्यमातून फेस रेकग्नायझेशन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. ही टेक्नोलॉजी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसविण्यात येणार आहेत. विशेषतः शहरातील गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच एसटी स्टँड, रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी या प्रकारचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून आरोपींना ओळखून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे. पेहराव बदलला तरी शहराच्या ठेवणीवरून हे सराईत आरोपी कॅमेर्यांत तत्काळ कैद होतील. त्यामुळे पुणेकरांबरोबरच पोलिसांसाठी हे सीसीटिव्ही कॅमेरे अधिक महत्वाचे ठरणार आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारीवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. तत्काळ कारवाई करणे शक्य होणार सीसीटीव्हीच्या माध्यमातून फेस रिकग्नायझेशन सिस्टिमचे काम चालणार आहे. सीसीटीव्हीत येणार्‍या प्रत्येक नागरिकाचा चेहरा या यंत्रणेच्या माध्यमातून ’कॅप्चर’ होईल. त्यानंतर पुणे पोलिसांकडे असणार्‍या गुन्हेगारांच्या माहितीनुसार गुन्हेगार किंवा संशयित, यामध्ये आढळून आल्यास त्याची सूचना नियंत्रण कक्षाला मिळून संबंधित ठिकाणी तत्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे. 2 हजार 886 सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर शहरात नवीन 2 हजार 886 सीसीटिव्ही कॅमेरे मंजुर झाले असून त्यासाठी 433 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये हे कॅमरे बसविण्यात येणार आहेत. ती बसविण्याचा प्रक्रीया लवकर सुरू होणार आहे. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article