पुण्यात मंत्रीपदासाठी अनेक इच्छूक:विजय शिवतारे, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे, माधुरी मिसाळ, राहुल कुल कॅबिनेटच्या शर्यतीत
11 hours ago
1
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला एकतर्फी काैल दिला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रबळ दावेदारी मानली जात असतानाच, आता मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट पदासाठी संधी मिळावी याकरिता निवडून आलेल्या ज्येष्ठ आमदारांकडून लाॅबिंग सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. मात्र, मंत्री पदासाठी पुण्यातून भाजपकडून चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, राहुल कुल, भीमराव तापकीर यांनी प्रयत्न सुरु केले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप वळसे पाटील,दत्ता भरणे यांना आणि शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना कॅबिनेट पदाची संधी मिळू शकते. महायुतीत कॅबिनेट पदाचे सुत्र ठरले असून त्यानुसार भाजपला 16 कॅबिनेट पदे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 9 पदे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 8 कॅबिनेट पदे मिळणार आहे. रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे एकटेच दिल्लीत अचनाक गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीस गेले. आगामी मंत्रीमंडळ विस्तार आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पद अनुषंगाने त्यांनी राजकीय चर्चा देखील केल्याची माहिती सुत्रांनी दिली. पुणे जिल्हयात 21 मतदारसंघात भाजपला 9, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांना 8, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांना 1 तर शिवसेना उबाठा, एनसीपी शरदचंद्र पवार गट 1 व अपक्ष 1 (एकनाथ शिंदे गट) अशा जागा मिळाल्या आहे. मात्र, काँग्रेस पुणे जिल्हयातून हद्दपार झाली असून त्यांच्या पक्षाची एक जागा देखील शहरी किंवा ग्रामीण भागात निवडून आलेली नाही. कॅबीनेट मंत्री पद विस्तारात स्थान मिळावे याप्रमाणेच राज्यमंत्री पदावर वर्णी लागावी यासाठी देखील राजकीय दबाव निर्माण करण्याचे काम काही आमदारांकडून मुंबईत सुरु करण्यात आले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)