पैशांसंदर्भातल्या सगळ्या बातम्या खोट्या:भाजप नेत्याने टीप दिल्याचा दावा खोटा, वसईतील घटनेवर विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण
2 days ago
2
माझी प्रतिमा मलिन व्हायचे कारण नाही, कारण पैशाचा विषय माझा नाही. पैशांसंदर्भातल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. भाजपच्या लोकांनी टीप दिली, हे हितेंद्र ठाकुर धादांत खोटे सांगत आहेत. टीप दिल्याचा दावा हा खोटा आहे, असे स्पष्टीकरण भाजप नेते विनोद तावडे यांनी दिले. ते आज सायंकाळी माध्यमांशी बोलत होते. कुणाला शंका असल्यास तुम्ही चौकशी करावी, सीसीटीव्ही तपासावे, असेही विनोद तावडे म्हणाले. दरम्यान, विनोद तावडे यांचे वसई येथील घटनेबाबत निवेदन जाहीर केले आहे. त्या ते म्हणाले की, वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. टीका करणाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी
हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत मा. निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी, असे विनोद तावडे यांनी निवेदनात म्हटले आहे. ही बातमी अपडेट करत आहोत...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)