पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी:ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाला मारहाणीनंतर प्रताप पाटील चिखलीकरांची प्रतिक्रिया

2 hours ago 1
नांदेडच्या लोहा येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपतालुकाप्रमुख संतोष वडवळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली होती. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविषयी नाव न घेता आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याच्या कारणाने ही मारहाण केल्याचा आरोप संतोष वडवळे यांनी केला आहे. या प्रकरणावर माजी खासदार प्रताप पाटील चिकलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी खासदार प्रताप पाटील चिकलीकर म्हणाले, मी मारहाणीचे समर्थन करत नाही. पण पोस्ट टाकताना आपली पात्रता आणि समोरच्या नेत्याची उंची पाहिली पाहिजे. मारहाण करणे चुकीचे आहे. ज्यांनी मारहाण केली त्यांना मी समज देतो, असे ते म्हणाले. मी चार दिवसांपासून मुंबईत आणि प्रवीण चिखलीकर कुबेरला आहेत. आमची नावे घेतली गेली यात तथ्य नाही, असेही प्रताप पाटील चिखलीकरांनी स्पष्ट केले आहे. नेमके प्रकरण काय? लोहा येथील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्टमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुप्पा येथून वडवळे यांचे अपहरण केले व एका फार्म हाऊसवर नेऊन बेदम मारहाण केली, असा आरोप करण्यात येत आहे. या मारहाणीत त्यांचे एक बोट देखील छटले असल्याचे समोर आले. फार्म हाऊसवर नेऊन दारूची बॉटल डोक्यावर ठेवत वडवळे यांना नाचायला लावले. तसेच फेसबुक पोस्ट केल्याबद्दल माफी मागायला लावली. या सगळ्या प्रकारानंतर वडवळे यांना एका रुग्णालयात टाकून आरोपी पसार झाले होते. संतोष वडवळेवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल संतोष वडवळे यांच्यावर 1 ऑक्टोबर रोजी मारहाण झाली होती. त्याच दिवशी घटना घडण्यापूर्वी संतोष वडवळे यांनी बालाजी कोकरे यांना संतोष व त्यांच्या वडील व भावाने जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप कोकरे यांनी केला आहे. तसेच मारहाण करत गळ्यातील सोन्याची चैन आणि अंगठी काढून घेतली. या आरोपावरून 3 ऑक्टोबर रोजी फिर्यादी बालाजी कोकरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत संतोष वडवळेसह त्याच्या वाडिलांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत दरोडा, मारहाण आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article