प्रत्येक महिलेत एक कलाकार दडलेला- आव्हाड:बाबूजी आव्हाड महाविद्यालयात ‘खेळ पैठणीचा-जल्लोष नवरात्रीचा' कार्यक्रम

2 hours ago 1
प्रत्येक स्त्रीमध्ये कोणत्या न कोणत्या स्वरूपात शक्तीरुपिणी दुर्गेचा संचार असतो. त्याच रूपाच्या बळावर आजची स्त्री आत्मनिर्भर झाली असून, स्वबळावर उंच भरारी घेत आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक बहीण, एक आई, एक पत्नी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक स्रियांमध्ये एक कलाकारही दडलेला असतो. त्यामुळेच त्यांच्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी मैत्रेयी ग्रुप दरवर्षी नवरात्रोत्सवात स्त्रियांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. नवरात्र म्हणजे शक्तिरूपिणी दुर्गेचा उत्सव साजरा करण्याचे दिवस असल्याचे प्रतिपादन मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविता आव्हाड यांनी केले. बाबूजी आव्हाड महाविद्यालयात अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान व मैत्रयी ग्रुपतर्फे आयोजित ‘खेळ पैठणीचा-जल्लोष नवरात्रीचा' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सिद्धार्थ पन्हाळे, निशा मते, सारिका नाईक, दीपाली बंग, खेळाडू कोमल वाकळे, प्राचार्य डॉ. बबन चौरे आदी उपस्थित होते. कविता आव्हाड म्हणाल्या, की पाथर्डी तालुक्यातील सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी मैत्रेयी ग्रुप सदैव प्रयत्नशील असून, आज खेळ पैठणीचा कार्यक्रमात भाग घेतलेल्या व जिंकलेल्या समाजातील या दुर्गा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. यावेळी छोटे भावजी सिद्धार्थ पन्हाळे यांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम झाला. संगीतखुर्ची, रस्सीखेच, चेंडू फिरवणे, फुगे फोडणे, रिंगमध्ये चेंडू टाकणे आदी खेळ खेळण्यात आले. अंतिम फेरीत मानाची पैठणी साक्षी सांगळे हिने मिळवली. सोन्याची नथ शिवकन्या खेडकर हिला, तर साडी पल्लवी शिंदे व प्रा. विद्या घोडके यांना मिळाली. स्पर्धेत विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल खेळाडू कोमल वाकळे हिचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. सुरेखा चेमटे यांनी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली आहेर यांनी, तर रेश्मा सातपुते यांनी आभार मानले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article