बाबा सिद्दिकींची हत्या हे गृहखात्याचे अपयश:सुरक्षा दिली असती तर ही घटना घडली नसती, आमदार मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

5 days ago 3
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदाराने सरकारला घरचा आहेर दिला आहे. बाबा सिद्दिकींसारख्या मोठ्या व्यक्तीची हत्या होणे हे गृहखात्याचे अपयश आहे. त्यांना सुरक्षा दिली असती तर ही घटना घडली असती, असे म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार अमोल मिटकरी म्हणाले, एकाच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या हत्या झाल्या. काल घडलेली घटना दुर्दैवी आहे. बाबा सिद्दिकी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांनी सुरक्षेची मागणी केली होती. पण त्यांना सुरक्षा देण्यात आली नाही, त्यामुळी ही घटना घडली, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. तीन आरोपी येतात, सिद्दिकींवर गोळ्या झाडतात ही बाब राष्ट्रवादी काँग्रेससाठी जितकी भयंकर आहे, तितकीच ती मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून भयंकर आहे. इतक्या मोठ्या व्यक्तीची हत्या होणे म्हणजे गृह खात्याचे अपयश आहे, असे म्हणत मिटकरी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला आहे. छगन भुजबळ यांनीही दिला घरचा आहेर बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे, असे भुजबळ म्हणाले. ही हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे. 10-12 हजारांत पोरं हत्या करतात. पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे. मी तुमच्या पाठीमागे उभा राहील. तुम्ही काय करतात हे मी विचारणार नाही. पण जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांची विल्हेवाट लावा. मात्र, ही केवळ गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे, असे भुजबळ म्हणाले. भायकळा येथील तालुका प्रमुखांची देखील निघृण हत्या झाली होती. या हत्या म्हणजे मुंबई पोलिसांसाठी एक चॅलेंज आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. हेही वाचा... बाबा सिद्दिकींच्या हत्येत 10-15 मुलांचा हात:विचारले- आमच्यासोबत दसरा साजरा नाही करणार का? फटाक्यांच्या आतषबाजीत गोळीबार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवा अँगल समोर आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सिद्दीकी यांच्या हत्येत चार आरोपी नाही, तर 10-15 जणांच्या टोळीचा सहभाग होता. बाबा सिद्दीकी यांच्या जवळच्या सूत्रांनी दिव्य मराठीला ही माहिती दिली आहे. केवळ बाबा सिद्दीकीच नाही तर त्यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी हे देखील लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article