बाबा सिद्दिकींच्या मृत्युनंतर सलमान खानच्या जीवाला धोका?:भाईजानची सुरक्षा वाढवली, बिग बॉस 18 चे शुटिंगही थांबवले

5 days ago 1
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची तिघांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येचे कनेक्शन बिश्नोई गँगसोबत असल्यामुळे आता अभिनेता सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खानच्या घराबाहेर अतिरिक्त पथक तैनात करण्यात आले आहे. कोणालाही घराबाहेर पडू दिले जात नाही. तसेच सलमान खानच्या घराबाहेर कोणालाही थांबू देत नसल्याची माहिती देखील मिळत आहे. बाबा सिद्दिकी आणि सलमान खान यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. सिद्दिकी यांनी आयोजत केलेल्या इफ्तार पार्टीला सलमान खान हजेरी लावायचा. बाबा सिद्दिकींच्या हत्येची माहिती मिळल्यानंतर सलमान लीलावती रुग्णालयात पोहोचला होता. सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबादारी बिश्नोई गँगने घेतली आहे. बिश्नोई गँगच्या एका सदस्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली. या पोस्टमध्ये सलमान खानच्या नावाचा उल्लेख असल्याने सलमान खानच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. तसेच यापूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे आता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बिग बॉसचे शुटिंग थांबवले सलमान खानला घरीच राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्याच्या बिग बॉस 18 चे शुटिंग देखील थांबवण्यात आले आहे. तसेच सलमानच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्याद्वारे त्याच्या घराच्या आसपास येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सलमानच्या घराकडे येणाऱ्यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. लॉरेन्स गँगने सलमानला सांगितले - आम्हाला वाद नको होते, तू आमच्या भावाचे नुकसान केलेस लॉरेन्स गँगला टॅग करत शुभू लोणकर महाराष्ट्र नावाच्या युजरने सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'सलमान खान, आम्हाला हे वाद नको होते, पण तुम्ही आमच्या भावाचे नुकसान केले. आज सिद्दिकीच्या शालीनतेचे पूल बांधणारा बाबा एकेकाळी दाऊदसोबत मकोका कायद्याखाली होता. त्याच्या मृत्यूचे कारण म्हणजे अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणे. आमचे कोणाशीही शत्रुत्व नाही, पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करेल, त्यांचा हिशेब केला जाईल. जर कोणी आमच्या भावांना मारले तर आम्ही नक्कीच प्रतिक्रिया देऊ. आम्ही कधीच पहिला वार केलेला नाही, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. हेही वाचा... बाबा सिद्दिकी हत्येतील हरियाणाच्या शूटरची कहाणी:खून प्रकरणी तुरुंगात गेला, लॉरेन्स टोळीत सामील झाला; आजी म्हणाली- चौकात उभे करून शूट करा मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करणारा शूटर गुरमेल सिंग (23) हा हरियाणातील कैथल जिल्ह्यातील रहिवासी आहे. गुरमेलचे गाव नरड आहे. 31 मे 2019 रोजी त्याने कैथलमधील रुद्री मंदिराजवळ त्याच्या मित्राच्या भावावर बर्फाच्या सुईने 52 वार केले. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची रवानगी कैथल कारागृहात केली. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article