बाभूळगावजवळ दुचाकी-ट्रकचा अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार:तर दुसऱ्याचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

2 hours ago 1
बाभूळगाव बसस्थानकाकडून शहरात येत असलेल्या दुचाकी व शहरातून बसस्थानकाकडे जात असलेल्या ट्रकचा मोठ्या पुलावर भीषण अपघात झाला. ही घटना मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीस्वार हरेश्वर सुरेश गायकवाड वय २६ वर्ष, रा. गवंडी हा जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला पंकजकुमार वय ३५ वर्ष, रा. लबादा, उत्तरप्रदेश हा गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ येथे हलवले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. मोठ्या पुलावर ११.३० वाजेदरम्यान एका ऑटोरिक्षाचा समोरील टायर फुटून तो अपघातग्रस्त झाला. त्यामध्ये असलेले पाणीपुरी बनविण्याचे पाणी व साहित्य रस्त्यावर पडले. रस्त्यावर घट्टपाणी सांडल्यामुळे घरसण तयार झाली. त्यानंतर १२.१५ वाजेच्या सुमारास गवंडी येथील रहिवासी हरेश्वर सुरेश गायकवाड वय २६ वर्ष हा युवक बाभूळगाव येथे जात होते. बसस्थानकावरून सदर युवकाने पंकज कुमार या एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास लिफ्ट दिली. हरेश्वर गायकवाड याची दुचाकी क्रमांक एमएच-२९-एजी-२९७३ मोठ्या पुलाजवळ आल्याबरोबर तेथे सांडून असलेल्या पाणीपुरीच्या पाण्यावरून घसरली. त्याच वेळी समोरून सिमेंट घेवून येत असलेला ट्रक क्रमांक एमएच-३४-बीझेड-६३५४ या वाहनाच्या मागील चाकात हरेश्वर गायकवाड फरफटल्या गेला. तर पाठीमागील पंकजकुमार रस्त्यावर फेकल्या गेला. हरेश्वरला जबर दुखापत होवून तो जागीच ठार झाला. तर पंकजचा रुग्णालयात प्राण सोडले. पोलिसांनी पाठलाग करत ट्रक पकडल्याचे सांगितले. अपघातातील दुचाकी व ट्रक.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article