यात तीन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून खासदार सुनील तटकरे प्रवास करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून खासदार सुनील तटकरे प्रवास करणार असल्याची माहिती समोर आली आहे.