बिटकॉइन घोटाळ्यात सुप्रिया सुळे, पटोले यांचा सहभाग- रवींद्र पाटील:स्पष्टीकरण देण्याची भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची मागणी

1 day ago 1
राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बिटकॉइन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका करत सवाल उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा बिटकॉइन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषदेत केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी उघडकीस आलेल्या भाजपचे राष्ट्रीय सचिव विनाेद तावडे यांच्या पैसे वाटप प्रकरणात निर्माण झालेला राजकीय गोंधळ थांबत नाही तोच आता बिटकॉइनचा वाद समोर आला आहे. बिटकॉइनच्या माध्यमातून निवडणुकीला निधी दिला जात असल्याचा आरोप माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांनी केला. यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सुधांशू त्रिवेदी म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी जी मोहब्बत की दुकान चालवत आहेत, ते चालवायला पैसे कुठून येत आहेत? आम्ही एवढ्या रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत आहोत, त्यामागे खूप मोठे कारण आहे. भाजपने या पत्रकार परिषदेत दोन ऑडिओ क्लिप ऐकवल्या आणि काही चॅटिंग दाखवत पैसे दिले जात असल्याचा आरोप केला. सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, या क्लिप आणि चॅट्समध्ये, एका माजी पोलिस अधिकारी जे तुरुंगात राहिले आहेत त्यांच्याशी आरोपी डीलरने संपर्क साधतो आणि बिटकॉइनचे काही पैसे कॅशने ट्रान्सफर करायचे आहेत, असे म्हणतो. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून आपण चर्चेस तयार असल्याचे सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article