बीड: राष्ट्रवादीच्या नेत्याला मारहाण; घाटनांदुर येथे ईव्हीएम मशीनची तोडफोड

2 days ago 2
पुढारी वृत्तसेवा

Published on

20 Nov 2024, 10:04 am

Updated on

20 Nov 2024, 10:04 am

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडच्या परळी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अॅड. माधव जाधव यांना मारहाण झाल्याच्या प्रकारानंतर घाटनांदुर येथे तीन बूथ वरील मतदान यंत्र तसेच इतर साहित्याची तोडफोड करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बन्सी शिरसाठ यांची गाडी देखील फोडण्यात आली.

या सर्व घटना एकापाठोपाठ एक घडत असल्याने आता पोलीस यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आली आहे. घाटनांदुर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. आता मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरळीत सुरू करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हालचाली सुरू आहेत.

परळी मतदारसंघात ईव्हीएम मशीन तोडफोड सुरूच

घाटनांदुर येथे तीन बूथ वरील मतदान यंत्र फोडल्यानंतर चोथेवाडी व मुरंबी येथील मतदान केंद्रातही तोडफोड करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article