पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.Twitter
Published on
:
22 Nov 2024, 10:23 am
Updated on
:
22 Nov 2024, 10:23 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Border Gavaskar Trophy : टीम इंडिया आणि आणि ऑस्ट्रेलियन संघ यांच्यात पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला भारतीय संघ अवघ्या 150 धावा करून ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत यजमान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुंग लावला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कांगारू संघाचे 7 फलंदाज 67 धावांत माघारी पाठवले. पहिल्या डावाच्या आधारे यजमान संघ अजूनही भारतापेक्षा 83 धावांनी मागे आहे. ॲलेक्स कॅरी (19*) आणि मिचेल स्टार्क (6*) सध्या नाबाद आहेत. भारताकडून बुमराहने 4 आणि मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले, तर पदार्पणवीर हर्षित राणाने एक विकेट घेतली.