बेपत्ता नंदू धंदरे यांचा खून झाल्याचे उघड:दोन वर्षांनंतर लागला छडा; 2 आरोपींना अटक

4 days ago 3
गणेशपूर येथील रहिवासी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिक नंदू श्रीराम धंदरे (४२) हे दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते. दरम्यान, त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा खून करून मृतदेह शेतात गाडून आणि त्यांची दुचाकी नदीपात्रात फेकून पुरावा नष्ट करणाऱ्या गणेशपूर येथील दोन आरोपींना हिवरखेड पोलिसांनी अटक केली आहे. नंदू धंदरे हे १८ ऑक्टोबर २०२२ रोजी हरविल्याची तक्रार त्यांची पत्नी सविता धंदरे यांनी दिली होती. शोध घेणे सुरू असतानाच पोलिस हेडकाँस्टेबल विठ्ठल चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गणेशपूर येथील दीपक शालीग्राम ढोके (२३) याला ११ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने घडलेल्या घटनेची माहिती देऊन, मुख्य आरोपी असलेल्या अतुल गंगाराम कोकरे (२८, रा. गणेशपूर) याचे नाव सांगितले. त्यानुसार त्यालाही पोलिसांनी दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने कबुली दिली. नंदूच्या मृत भावाच्या पत्नीशी आपले संबंध होते. त्यामध्ये नंदू अडसर ठरत असल्याने त्याच्यावर १८ ऑक्टोबर २०२२ रोजी फावड्याच्या दांड्याने हल्ला करून त्याला मारले. त्याचा मृतदेह दीपक ढोके याच्या मदतीने आपल्या शेतात खड्डा खोदून गाडून टाकला. तसेच त्याची दुचाकी नदीत फेकून दिली, असे अतुल कोकरे याने सांगितले. घटनास्थळावरून सांगडा जप्त हिवरखेड पोलिसांनी नायब तहसीलदार जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे, गणेशपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे पागोरे आदींच्या समक्ष खड्डा खोदला. त्यावेळी नंदूचा हाडांचा सांगाडा आढळून आला. तो सांगडा पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी अतुल कोकरे व दीपक ढोके यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार कैलास चौधरी व पोलिस कॉस्टेबल महेंद्र नारखेडे करत आहेत. दरम्यान, आरोपींना १३ ऑक्टोबर रोजी खामगाव येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article