भाजप कार्यकर्त्यांचा स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न:शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांचा गंभीर आरोप
6 hours ago
1
भाजपच्या सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी X वर पोस्ट करत केला आहे. दरम्यान आमदार रोहित पवार म्हणाले की, सीआरपीएफ आणि माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवारांचे ट्विट काय? रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, भाजपच्या सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे कार्यकर्ते आणि CRPF च्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याबाबत त्यांचे आभार! याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी. भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे… पण पुढील चोवीस तासातच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही. कर्जत-जामखेडची लढत यंदाही ठरणार लक्षवेधी महाराष्ट्रातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रोहित पवार यांनी 1,35,824 मतांनी विजय मिळवला आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा)चे प्रा. राम शंकर शिंदे यांचा 43,347 मतांच्या फरकाने पराभव केला. आमदार राम शिंदेंचे शरद पवारांना आव्हान मी काय केले, यापेक्षा तुमच्या नातवाला पाच वर्षांमध्ये काय केले याचा हिशेब विचारा, असे आव्हान आमदार राम शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिले. कुकडीसाठी पाच टीएमसी पाणी अतिरिक्त मंजूर झाले आहेत. मात्र हे सर्व त्यांना काही कळणार नाही अशी उपरोधक टीका रोहित पवार यांच्यावर राम शिंदे यांनी केली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)