भाजपचे शेंडगे यांना मारहाण, शिवीगाळ; इम्तियाज यांच्याविरुद्ध ॲट्राॅसिटी दाखल:मतदानाच्या दिवशी पंडित नेहरू काॅलेजमधील केंद्रावर झाला होता वाद
3 hours ago
1
भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांना जातिवाचक उल्लेख करून मारहाण, शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून एमआयएमचे संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. जालिंदर शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० नोव्हेंबर रोजी व मतदान सुरू होते. भारतनगरमधील अनेक रहिवाशांचे मतदान पंडित नेहरू महाविद्यालयातील केंद्रावर होते. शेंडगे सायंकाळी पाचच्या सुमारास केंद्रावर मतदार सुरळीत सुरू आहे का हे पाहण्यासाठी गेले होते. ते केंद्र क्रमांक १९७ येथे असताना सव्वापाचच्या सुमारास एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे आपल्या १५ ते २० सहकाऱ्यांसह तेथे आले. त्यांनी मतदारांना धमकावण्यास सुरुवात केली. शेंडगे त्यांना समजावण्यास गेले असता इम्तियाज जलील यांनी जातिवाचक अपशब्द वापरून मारहाण केली. प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर पुंडलिकनगर ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त रंजित पाटील करीत आहेत. इम्तियाज जलील यांचीही शेंडगेंविरुद्ध तक्रार ॲट्राॅसिटी गुन्हा दाखल झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी निवडणूक आयोग व पोलिस आयुक्तांना शेंडगे यांच्याविरोधात तक्रार दिली. शेंडगे यांनी मतदान केंद्रावर बोगस मतदान करून घेतल्याचा आरोप केला. त्यांच्याकडे अनेक जणांकडे बोगस मतदान कार्ड आढळले. शेंडगे यांनी त्यांच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)