"अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा", अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली.
“अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.
तुमचा भाजप सांभाळा. दहा बारा दिवसांपूर्वी मी नागपूरला गेलो होतो. मी शहरीबाबू आहे. मी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त केलं. माझं कर्तव्य म्हणून केलं. दहा रुपयात पोळी भाजी दिली कर्तव्य म्हणून दिली. मी कोरोनात काम केलं. ते कर्तव्य म्हणून केलं. मी नागपूरला गेलो. लोकांनी व्यथा सांगितल्या. सोयाबीनला भाव नाही. संत्र्यावर डिंक्या रोग येतो. कापसाच्या बोंडावर गुलाबी अळी येते. ती जॅकेट घालते की नाही माहीत नाही. अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा. आम्हाला वाईट वाटतं एकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो. त्यांना सत्ता पाहिजे. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले.