भाजपच्या माजी आमदाराचे 'सिमोल्लंघन':चरण वाघमारेंनी हाती घेतली 'तुतारी', महायुतीची वाढणार डोकेदुखी

5 days ago 2
तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी अखेर तुतारी हाती घेतली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यानिमित्ताने शरद पवार गटाची तुमसरात ताकद वाढणार असून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांच्यासह अजित पवारांचे खंदे समर्थक खा. प्रफुल्ल पटेल यांचे देखील टेन्शन वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत आंध्र प्रदेशातील के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या कारमधून फिरणारे माजी आमदार चरण वाघमारे यांनी आता वेगळा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारी वाघमारे यांनी अधिकृतपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे वाघमारे यांचे सिमोल्लंघन पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया जिल्ह्यात महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी बीआरएसची कार पंक्चर केली. त्यामुळे केसीआर यांची सत्ता गेली. याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला आहे. भारत राष्ट्र समितीचे कार्य महाराष्ट्रात थांबले आहे. बीआरएसच्या भवितव्यावरही आता महाराष्ट्रात प्रश्नचिन्ह लागले आहे. अशात राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न करत असलेले माजी आमदार चरण वाघमारे हे राव यांच्या कारमधील सिट सोडत शरद पवारांच्या राष्ट्वादीत डेरात दाखल झाले आहेत. तुतारी हातात घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या या माजी आमदाराने महायुतीच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे केल्याचे बोलले जात आहे जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातील एक मोठा राजकीय चेहरा म्हणून माजी आमदार चरण वाघमारे यांच्याकडे बघितले जाते. भंडाऱ्यात आमदार परिणय फुके यांची एन्ट्री झाल्यानंतर चरण वाघमारे आणि परिणय फुके यांचे कधी जमले नाही. त्यानंतर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा वाघमारे यांच्यावर ठपका ठेवत भाजपने त्यांना पक्षातून काढले. त्यानंतर आता त्यांची आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू झालेली आहे. तोपर्यंत भाजपमध्ये जाणार नाही भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भरोशावर सुरुवातीपासून चरण वाघमारे यांनी पकड ठेवलेली असून त्यांनी विधानसभा लढण्याची तयारी सुरू केलेली आहे. विधानसभा निवडणुकीची चाहुल लागताच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळी चरण वाघमारे यांच्या संपर्कात सुरुवातीपासूनच होती. त्याचप्रमाणे भाजपची वरिष्ठ नेतेमंडळी वाघमारेंना घरवापसी करण्यासाठी गळ घालत होती. मात्र, भाजपमधून काढल्यानंतर परिणय फुके भाजपात आहे, तोपर्यंत भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. विधानसभा लढण्याची तयारी चरण वाघमारे यांनी लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांना पाठिंबा दिला होता. पाठिंबा जाहीर करताना वाघमारे यांनी विधानसभा निवडणूक नक्की आणि लोकवर्गणीतून लढवणार, असे आधीच सांगितले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article