भाजपच्या माजी नगरसेवकाकडून पैसे घेणारे मतदार देवळाई तांड्यावरून गायब:पोलिसांच्या 3 गाड्या येऊन गेल्यामुळे दहशतीचे वातावरण

1 day ago 2
पश्चिम मतदारसंघात १५५ मतदार संख्या असलेल्या देवळाई तांडा येथे मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांच्या तीन गाड्या तांड्यावर गेल्या. त्यामुळे गावात दहशत पसरली होती. व्हिडिओमधील लोक तांड्यावरून निघून गेले होते. देवळाई तांडा येथे महायुतीच्या उमेदवाराचे पैसे वाटतानाचा व्हिडिओ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समोर आणला. या व्हिडिओमध्ये भाजपचे देवळाईचे माजी नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे पैसे देताना दिसत आहेत. ‘दिव्य मराठी’ने देवळाई तांड्याला भेट दिली. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांची ३ वाहने गावात येऊन गेली होती. त्यामुळे याबाबत गावातील कुणीही बोलण्यास पुढे आले नाहीत. व्हिडिओतील बाबा देवळाई तांडा येथील गणेश केसभट नावाचा हा व्यक्ती आहे. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधी केसभट यांच्या घरी गेले असता, त्यांच्या नातेवाइकांनी बोलण्यास नकार दिला. एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, केसभट हा वाळू विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याने त्याच्या घरात छोटे मंदिर स्थापन केले आहे. तो तेथे पूजाअर्चा करत असल्याचे सांगितले. हा तर विरोधकांचा कट अंबादास दानवे काय म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. माझा विजय निश्चित असल्यामुळे कट रचण्याचे काम सुरू आहे. विरोधकांनी काहीही केले तरी मतदार जागरूक आहेत. संपूर्ण घटनेचा पोलिस तपास करतील. पैसे वाटप करण्याचा प्रकार मी केलेला नाही. - संजय शिरसाट, उमेदवार, शिंदेसेना निवडणूक आयोग तपास करेल भाजपचे माजी नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या व्यवसायाशी संबंधित आर्थिक व्यवहाराचे व्हिडिओ चित्रीकरण असू शकते. याबाबत निवडणूक आयोग तपास करेल, - शिरीष बोराळकर, भाजप शहराध्यक्ष व्हिडिओमध्ये छेडछाड गणेशोत्सवाच्या काळात मजुरांकडून कामे करून घेतली होती. तेव्हा त्यांना प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे पैसे वाटप केले होते. पश्चिम मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येत असल्याने दानवे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते व्हिडिओमध्ये छेडछाड करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. - अप्पासाहेब हिवाळे, माजी नगरसेवक आरोपींवर गुन्हा दाखल जवाहरनगरच्या हद्दीत रात्री तत्काळ गुन्हा दाखल केला. स्थिर सर्वेक्षण पथकाच्या व्हिडिओ रेकाॅर्डिंगच्या आधारे तपास करून पैसे जप्त केले. त्यांच्या तक्रारीवरूनच गुन्हा दाखल केला आहे. - प्रवीण पवार, पोलिस आयुक्त व्हिडिओवरून कारवाई करा देवळाईमध्ये पैसे देताना भाजपच्या माजी नगरसेवकांचा व्हिडिओ आमच्याकडे आला आहे. पोलिस काहीही कारवाई करत नाहीत, हे मी सातत्याने सांगत आहे. मी या प्रकाराची तक्रार करणार आहे. - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील संवाद... गणेश महाराज : हे आपण आपल्या नावावर करू राहिलो.. मतदार : पाण्याचं काम? गणेश महाराज : हे सीट आपलं निवडून आलं धनुष्यबाणाचं.भय्याच्या ऑफिसवर (अप्पासाहेब हिवाळे, माजी नगरसेवक भाजप ) तुम्हाला नेऊन आपली जिम्मेदारी पाण्याचा नळ आणून देण्याची. हिवाळे : बरं का संदीप, सकाळी सकाळी जाऊन मतदान करायचं. कार्यकर्ता : नऊ जण आहेत, अजून तीन मतदार आहेत. (हिवाळे खिशात हात घालून आणखी पैसे काढतात आणि देतात) हिवाळे : संजूशेठ, यांचे किती, पिंटू भाऊचे? कार्यकर्ता : आठ लिहिले.. हिवाळे : चार हजार रुपये.. दुसऱ्यांना मतदान करायचं नाही बरं का... तीन नंबर लक्षात ठेवा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article