भाजपने झारखंड देऊन महाराष्ट्र घेतले:छोटी राज्ये देवून मोठी राज्ये घेण्याचा भाजपाचा डाव, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टिका

1 hour ago 1
विरोधकांना छोटी राज्ये देवून मोठी राज्ये घेण्याचा भाजपाचा डाव आहे. झारखंड देवून महाराष्ट्र घ्यायचे, तेलंगणा देवून हरियाणा हे मोठे राज्य द्यायचे हे उद्योग असल्याची टिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली. सध्या मिळालेला विजय भाजपालाही अनपेक्षित आहे. पण, हा विजय भाजप महायुतीचा नसून ईव्हीएमचा आहे असे ते म्हणाले. नाना पटोले यांच्या राजीनाम्याबद्दल मला आता प्रसार माध्यमातून माहिती मिळत आहे. या संदर्भात त्यांनी नक्की काय भूमिका हायकमांडकडे मांडली. त्यामुळे त्यावर भाष्य करणारा नाही असे ते म्हणाले. हे सरकार जनतेने निवडून दिले आहे काय? असा प्रश्न आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असतांनाही ४२ जागा काँग्रेसने जिंकल्या. आता फक्त १६ जागा जिंकल्या. सरकार विरुद्ध जनमत असताना इतक्या कमी जागा कशा आल्या असा प्रश्न जनता विचारीत आहे. लाडकी बहिण नावाने ५ टक्के मते फिरली असतील. पण अजून काय घडले यावर अभ्यास आणि विचार करावा लागेल असे ते म्हणाले. शेतकरी संकटात होता, सोयाबीन कापूस विकला जात नाही, पीक विमा, अवकाळी, अतिवृष्टी पैसे मिळाले नाही, महागाई वाढली असे प्रश्न असताना आणि सरकार विरुद्ध राग असताना राग कसा निघाला हे तपासावे लागेल असे वडेट्टीवार म्हणाले. शरद पवार गटाचे १० आमदार संपर्कात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. आमदार कोणाचा संपर्कात राहू द्या. शेवटी मोदी व शहा सांगतील ते होईल. राजे बोलतील ते होईल. विरोधक ठेवायचा नाही असे सगळे सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. पक्षाने आतापर्यत दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली आहे. आताही पक्षाने नवी जबाबदारी दिली तर पक्षाचा निर्णय मान्य असेल असे सूचक वक्तव्य केले. शेवटच्या टप्प्यात महायुतीतील तिनही पक्षातील वाद होता. उलट महाविकास आघाडी एकत्र काम करीत होती. हा निकाल धक्कादायक आहे. निर्णय न पचण्यासारखा आहे, असे ते म्हणाले. भाजपाने योगींना पंतप्रधान केले पाहिजे. कारण मोदींपेक्षा योगींचा स्ट्राईक रेट जास्त आहे. योगी जिथे जातात तिथे भाजपा जिंकते तर मोदी जातात तिथे हरते, असा टोला वडेट्टीवार यांनी हाणला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article