‘भारताचे संविधान’, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ला विशेष मागणी:अकोला येथे धम्म मे‌ळाव्याच्या ठिकाणी पुस्तकांच्या स्टॉलला वाचक

4 days ago 3
अकोला येथील अकोला क्रिकेट क्लबवर रविवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या धम्म मेळाव्याच्या ठिकाणी लावलेल्या पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर ‘भारताचे संविधान‘, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत पुस्तकांना विशेष मागणी होती. तसेच ‘पाकिस्तानची फाळणी’ ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ ‘प्राब्लेम ऑफ रुपीज’,‘माझी आत्मकथा’, ‘रमाई’, ‘जग बदलणारा बाप माणूस’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले सर्व खंड, चांगदेव खैरमोडे यांचे आणि बी.सी. कांबळे यांचे खंड विक्रीस ठेवण्यास आले आहेत. त्याचबरोबर भारतीय संविधान, जातीव्यवस्थेचे निर्मूलन ही पुस्तकेदेखील पुस्तक स्टॉलवर उपलब्ध होती. ज्यांची किमान किंमत ५० रुपयांपासून सुरू होते. अशा पुस्तकांना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक लहानमोठ्या प्रकाशनांनी, विक्रेत्यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी अशा भाषेतील दहा पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारले होते. पाचशेवर पुस्तक विक्री झाल्याचा अंदाज आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जत्रेत गेल्यावर पुस्तकांची खरेदी करतात. त्यामुळेच ही एक वैचारिक क्रांती आहे,याची अनुभूती आजच्या अकोला येथील धम्म मेळाव्या ठिकाणी झालेल्या पुस्तक खरेदीतून दिसून आली. धम्म मेळाव्याच्या ठिकाणी अकोला क्रिकेट क्लब परिसराला सायंकाळी जत्रेचे स्वरुप आले होते. विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल. प्रबोधनपर मार्गदर्शन शिबिरे, क्रांतीगीतांच्या ध्वनिफिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या साहित्य, महामानवाच्या प्रतिमा व पुतळे खरेदी करण्यासाठी स्टॅालवर गर्दी उसळली आहे. रात्री उशिरापर्यंत लोकांची गर्दी दिसून आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तकांची सवलतीच्या दरात विक्री होत असल्याने त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. पुस्तकांचे १० स्टॉल लावण्यात आले आहेत. विविध भागांतून नामवंत प्रकाशन संस्थांनी यात सहभाग घेतला आहे. डॉ. आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, यांृसह पुरोगामी विचारधारेची पुस्तके येथे विक्रीसाठी ठे‌वण्यात आली होती. यंदा पुस्तक खरेदी ३० टक्के घटली, दरही वाढले ^यंदा पुस्तकांच्या किंमती सरासरी १० टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षी ४०० रुपयांना मिळणारे पुस्तक यंदा ५०० रुपयांना मिळ‌त आहे. तसेच दरवर्षीपेक्षा यावर्षीचा लोकांचा पुस्तक खरेदीचा कल ३० टक्के कमी दिसून आला. मात्र आजच्या ऑनलाइनच्या जमान्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकांना मागणी कायम आहे. -सुगत खंडारे, तथागत बुक स्टॉल,अशोक वाटिका, अकोला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article