भाविकांनी ओढला बालाजीचा रथ;‎ 137 पदार्थांचा चढवला देवाला भोग:शेवटच्या दिवशी भाविकांची कर्णपुऱ्यात गर्दी, विजयोत्सवही केला साजरा‎

2 hours ago 1
कर्णपुरा येथील बालाजी मंदिर ट्रस्ट,‎कुमावत समाजाच्या वतीने‎सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास‎बालाजी भगवंतांची उत्सव मूर्तीची‎रथयात्रा काढली. या वेळी पोलिस‎आयुक्त प्रवीण पवार, मंदिराचे‎पुजारी राजेंद्र पवार, गोपालकृष्ण‎पुजारीसह आदींची उपस्थिती होती.‎बँडपथक, ढोल-ताशांच्या गजरात‎दीडशे वर्षांपूर्वीचा बालाजीचा रथ‎ओढण्यात आला. मिरवणूक मार्गावर‎पंचमुखी मंदिराचे वैष्णव कुटुंब,‎करणसिंग काकर, बैरागी वाडा,‎मालखरे कुटुंबातर्फे आरती करण्यात‎आली. उत्सवमूर्ती मंदिरात‎परतल्यानंतर मूळ मूर्तीची भेट होऊन‎मान्यवरांनी आरती केली. प्रसाद‎वाटप केला.‎ मंदिरात मूर्तीचे ‎भाविकांकडून पूजन‎ पहाटे बालाजी मंदिरात भगवंतांना‎पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात‎आला. चंदनाच्या ३ फुटांच्या‎बालाजी मूर्तीचे पाद्यपूजन केले.‎चंदनाची दोन फुटांची लक्ष्मीची व‎श्रीराम मूर्तीचे पूजन केले.‎पंचधातूची असलेल्या बालाजी‎मूर्तीचा अभिषेक करण्यात आला.‎ऋतुजा मांडे यांच्यामार्फत १३७‎प्रकारच्या पदार्थांचा भोग‎लावण्यात आला. नारळ प्रसाद‎देण्याची परंपरा मंदिराने कायम‎ठेवली. यंदाही चारशे भाविकांना‎हा प्रसाद देण्यात आला.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article