भीमसैनिकांनी फुलला बुद्धलेणी परिसर,‎क्रांतिकारी भीमगीतांनी भरला जल्लोष‎:प्रज्ञा प्रसार धम्मसंस्कार केंद्रात नतमस्तक झाले बुद्ध अनुयायी, दिवसभर लाखोंची गर्दी‎

2 hours ago 1
‘ज्याची भूमी तो बुद्धाचा चेला, इथे उपरे सारे ‎‎तुम्ही,‎ बुद्धाचे विहार हटणार नाही, ही बुद्धाची रे ‎‎भूमी... ’ शाहीर मेघानंद जाधव यांच्या‎पहाडी स्वरांतील या गीताने शनिवारी ‎‎बुद्धलेणीचा परिसर भारावून गेला. नुकत्याच ‎‎झालेल्या आंदोलनानंतर बुद्धविहार सुरक्षित‎झाले. या पार्श्वभूमीवर भीमसैनिकांचा‎उत्साह अद्वितीय होता. ऐतिहासिक‎बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या प्रज्ञा,‎प्रसार धम्मसंस्कार केंद्राचे प्रांगण शनिवारी‎लाखो भीमसैनिकांच्या उत्साहाने फुलले‎होते. हुकमती आवाजातील भीमगीतांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎वातावरणात जल्लोष भरला होता. पहाटे‎ध्यानसाधनेनंतर धम्मध्वजारोहण झाले.‎परित्राण पाठ, भिक्खूंची धम्मदेसना,‎वर्षावास करणाऱ्यांचे सत्कार,‎ग्रंथमेळ्यालाही गर्दी झाली.‎ यंदाचा ६८ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन‎सर्वार्थाने अनोखा ठरला. बुद्धविहारातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत‎भीमसैनिक पहाटेपासूनच उत्साहाने‎सहभागी झाले होते. या वेळी विहाराचे‎संस्थापक भदंत विशुद्धानंद बोधी‎महास्थवीर, म्यानमारचे भदंत डॉ. संदामुनी‎महास्थवीर आणि भदंत संघप्रिय स्थवीर‎यांनी धम्मदेसना दिली.‎ विलक्षण उत्साहात धम्मदेशनेतून घेतला संदेश‎ दरवर्षी लेणीच्या पायथ्याशी होणारा हा धम्ममेळा प्रत्येक आंबेडकरी अनुयायासाठी खास‎असतोच, पण यंदा त्याला नुकत्याच झालेल्या आंदोलनाची झालर होती. शाहीर मेघानंद‎जाधव यांच्या गीतांनी वातावरणात जाज्वल्य निर्माण केले होते. प्रत्येक भीमसैनिक‎भारावलेला होता. महिला अन् तरुणींचा उत्साहदेखील विलक्षण होता. शुभ्र वस्त्र परिधान‎केलेले उपासक -उपासिकांनी वातावरण चैतन्यमयी झाले होते.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article