"मतदानाला जाताना मोबाइल सांभाळण्यासाठी मदतनीस न्या':मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात ‘नो एंट्री’
1 day ago
2
अमरावती बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी मतदानाला जाताना मोबाइलसोबत बाळगणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे एकतर तो सोबत बाळगू नका किंवा बाळगायचाच असेल तर त्यासाठी सोबत एक मदतनीस ठेवावा लागण्याची वेळ येऊ शकते. निवडणूक नियमांनुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईलला ‘नो एंट्री’ आहे. त्यामुळे मोबाईल बाळगू नका, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास बंदी आहे. यामध्ये केवळ निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट आहे. त्यामुळे इतर मतदारांनी असे कोणतेही साधन सोबत बाळगू नये, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई ^मोबाइल किंवा इतर गॅजेट वापरण्यास बंदी असल्याने कुणाही मतदाराने सोबत अशी साधने बाळगू नये. प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. त्यामुळे ज्यांना सूट आहे, त्यांना वगळून इतरांनी मोबाइल वापरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. -सौरभ कटियार, जिल्हा निवडणूक अधिकारी, अमरावती.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)