मतदानाला जाताना मोबाईल सांभाळण्यासाठी लागेल मदतनीस:मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात ‘नो एंट्री’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
2 days ago
1
उद्या, बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदानाला जाताना मोबाईलसोबत बाळगणे अडचणीचे ठरु शकते. त्यामुळे एकतर तो सोबत बाळगू नका किंवा बाळगायचाच असेल तर त्यासाठी सोबत एक मदतनीस ठेवावा लागण्याची वेळ येऊ शकते. निवडणूक नियमांनुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईलला ‘नो एंट्री’ आहे. त्यामुळे मोबाईल बाळगू नका, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास बंदी आहे. यामध्ये केवळ निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुट आहे. त्यामुळे इतर मतदारांनी असे कोणतेही साधन सोबत बाळगू नये, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा आहे पर्यायी उपाय एखाद्या मतदाराला मोबाईलसह घराबाहेर पडणे आवश्यकच असेल तर मतदानाला जाताना त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा आप्तस्वकीयाला सोबत ठेवावे. म्हणजे एकेकाने मतदान करता येईल. उदाहरणार्थ पती-पत्नी दोघेही मतदानाला गेले, त्यावेळी आधी पती मतदानासाठी गेल्यास पत्नीला १०० मीटर आधी थांबून मोबाईल सांभाळता येईल किंवा पत्नी मतदानाला गेल्यास पतीला ही जबाबदारी सांभाळावी लागेल. उल्लंघन केल्यास कारवाई मोबाईल किंवा इतर गॅजेट वापरण्यास बंदी असल्याने कुणाही मतदाराने सोबत अशी साधने बाळगू नये. प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. त्यामुळे ज्यांना सूट आहे, त्यांना वगळून इतरांनी मोबाईल वापरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)