मनसे महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी लढते, असे वाटायचे..:..ती आता गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढते- आदित्य ठाकरे, शिंदेंसोबतच्या आमदारांवर डागली तोफ

2 hours ago 1
मनसे महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी लढते, असे वाटायचे, ती आता गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढते आहे, असे दिसते, असा टोला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, गुजरातचे महाराष्ट्रावरील प्रेम हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रातील रोजगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला नेले. त्यांच भाजपला मनसेने लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर आता विधानसभेत मनसेने देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला आहे. पैसे घेऊन बदलीस ठाकरेंचा नकार आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार हे बदलीचे कामं घेऊन उद्धव ठाकरेंकडे येत होते, त्यांनी पैसे घेऊन बदलीस नकार दिला. यामुळे अनेक गैरमार्गाने पैसे मिळण्याचे साधन बंद झाले अन् ही लोकं सरकारमधून बाहेर पडले. ..म्हणून आमदार बाहेर पडले आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल काही आमदार बदलीचे कामे घेऊन यायचे. मात्र ठाकरेंनी पैसे घेऊन बदल्या करण्यास नकार दिला. याशिवाय अनेक गैरमार्गाने पैसे मिळवण्याचे साधन बंद केले, यातून पक्षातील आमदार पळाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article