पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेमरी लॉस्ट झालीय… राहुल गांधी असं का म्हणाले?; अमरावतीतील सभेतून हल्ला काय?

1 hour ago 1

Rahul Gandhi connected PM Narendra Modi : अमरावतीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होत आहे. या सभेतून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. यंदाची ही विचारधारेची लढाई आहे, असंही राहुल गांधी म्हणालेत. वाचा सविस्तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेमरी लॉस्ट झालीय... राहुल गांधी असं का म्हणाले?; अमरावतीतील सभेतून हल्ला काय?

नरेंद्र मोदी, राहुल गांधीImage Credit source: Facebook

| Updated on: Nov 16, 2024 | 1:08 PM

ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी आहे तर दुसरीकडे भाजप, संघ आहे. देश संविधानाने चालला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पण पंतप्रधान म्हणतात हे रिकामं पुस्तक आहे. यात काही लिहिलं नाही. हे पुस्तक केवळ संघाच्या कार्यकर्त्यांसाठी रिकामं आहे. भाजपसाठी आहे. आमच्यासाठी संविधान हे देशाचा डीएनए आहे. यात आंबेडकर, फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, बुद्ध, नारायण गुरू, बसवण्णा, महात्मा गांधी यांचे विचार आहेत. हे आमच्यासाठी नवं पुस्तक नाही. तर हा हजारो वर्षांपासूनच्या विचारधारेचा दस्ताऐवज आहे. त्यासाठी लोक लढत आहेत, मरत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article