iPhone 16 Prices : आनंदवार्ता, लाँचिंगनंतर काही महिन्यातच आयफोन 16 झाला स्वस्त, येथे मिळवा कमी किंमतीत

2 hours ago 1

iPhone 16 नुकताच लाँच झाला. तरीही या नवीन स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. ॲप्पलच्या या ताज्या दमाचा आयफोन Amazon आणि Flipkart या ई-कॉमर्स साईटवर स्वस्तात मिळत आहे. पण कंपनीच्या अधिकृत ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअरवर या फोनच्या किंमतीत कोणतीच कपात झालेली नाही. पण या फोनच्या खरेदीवर बँकेची ऑफर सुरू आहे. पात्र ग्राहकांना ॲप्पलचा हा ताज्या दमाचा स्मार्टफोन स्वस्तात मिळत आहे. iPhone 16 अशा प्रकारे तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येईल.

याठिकाणी मिळेल स्वस्तात स्मार्टफोन

फ्लिपकार्ट वर iPhone 16 हा 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत आहे. या स्मार्टफोनवर बँकेकडून 5,000 रुपयांच्या सवलतीत मिळतो. ॲप्पलने लेटेस्ट iPhone 16 याच किंमतीत लाँच झाला होता. हा स्मार्टफोन ग्राहकांना तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये – 128GB, 256GB आणि 512GB मध्ये मिळतो. ई-कॉमर्स साईट Amazon वर iPhone 16 हा 77,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीला आहे. हा स्मार्टफोन 2,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. याशिवाय बँकेकडून 5,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळते. म्हणजे iPhone 16 लाँच किंमतीपेक्षा हा स्मार्टफोन 7,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे किंमत

iPhone 16 आणि iPhone 16 Plus हे दोन मॉडल बाजारात उतरवण्यात आले आहे. ते Ultramarine, Teal, Pink, White आणि Black या रंगात मिळतील. या सीरीजमध्ये 128GB, 256GB, आणि 512GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. iPhone 16 ची सुरूवातीची किंमत 79,900 आणि iPhone 16 Plus ची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये आहे.

तर iPhone 16 Pro (128GB) ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे. तर iPhone 16 Pro Max (256GB) ची सुरुवातीची किंमत 1,44,900 रुपये इतकी आहे. आयफोन 16 मध्ये 6.1 इंच आणि आयफोन 16 Plus मध्ये 6.7 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन ब्राईटनेस 200 Nits आहेत. कॅमेरा कॅप्चर बटन देण्यात आले आहे. यामध्ये A18 चिपसेट देण्यात आला आहे.

iPhone 16 चे फीचर्स काय

आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस मध्ये तुम्हाला जवळपास सर्वच फीचर्स मिळतील. पण या फोनमध्ये बॅटरी आणि डिस्प्लेचा आकार वेगवेगळा असेल. हे दोन्ही मॉडेलमध्ये नवीन A18 चिपसेट असेल. चिपसेट A16 Bionic च्या तुलनेत ही नवीन चिफसेट 30 टक्के अधिक जलद आहे. या नवीन स्मार्टफोनचा GPU गेल्या मॉडेलच्या तुलनेत 40 टक्के अधिक गतिमान आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article