संजू सॅमसनने मारलेला षटकार चक्क युवतीच्या गालावर जावून आदळला.
Published on
:
16 Nov 2024, 9:08 am
Updated on
:
16 Nov 2024, 9:08 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : संजू सॅमसने टी-20 संघामध्ये पुनरागमन झाल्यापासून त्याची बॅट आग ओकत आहे. मागील मालिकेमध्ये त्याने बांगलादेशचा धुव्वा उडवला. आता सॅमसनचे रौद्ररूप दक्षिण आफ्रिकेत पाहायला मिळाळे आहे. पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावल्यानंतर संजूने चौथ्या टी-20 सामन्यात स्फोटक खेळी करत आणखी एक शतक झळकावले. जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात संजूने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवरहल्लाबोल केला. संजूने मारलेला गगनचुंबी षटकार चक्क एका तरुणीच्या चेहऱ्यावर जोरदार आदळला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शुक्रवारी (दि.15) जोहान्सबर्ग येथे T20 मालिकेतील शेवटचा सामना झाला. गेल्या दोन सामन्यात 0 धावांवर बाद झाल्याची निराशा मागे टाकत भारतीय सलामीवीराने पुन्हा चाहत्यांना चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्याची स्फोटक शैली दाखवली. सॅमसनच्या बॅटमधून पुन्हा षटकारांचा पाऊस पडला. या सामन्यात त्याने फटकावलेला एक उत्तुंग षटकार तरुणीसाठी वेदनादायी ठरला.
चेंडू तरुणीच्या गालावर आदळला
भारतीय डावाच्या 10व्या षटकात फिरकीपटू ट्रिस्टन स्टब्स गोलंदाजीवर संजूने लागोपाठ दोन षटकार मारले; पण त्याचा एक फटका इतका वेगाने होता की, स्टँडमध्ये बांधलेल्या रेलिंगला लागून प्रेक्षक तरुणीच्या तोंडावर आदळला, रेलिंगला आदळल्यानंतर चेंडू वेगाने त्याच्या दिशेने आला तिला स्वत:ला वाचवण्याची संधीच मिळाली नाही. परिणामी, चेंडू त्याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला आणि गालावर जोरदार आदळला. यामुळे उपस्थित प्रत्येक प्रेक्षक घाबरला.तिने आरडाओरडा केला. तिच्या चेहऱ्यावर 'आईस पॅक' लावण्यात आला. ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत झाली.