जे. पी. नड्डा यांनी आज ठाण्यातील प्रतिष्ठित व्यक्ती, व्यावसायिक, उद्योगपतींसह प्रभावशाली ठाणेकरांशी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बदलत्या भारताची वस्तुस्थिती मांडून ठाणे विधानसभेचे भाजपचे उमेदवार संजय केळकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमेदवार प्रताप सरनाईक आणि नजीब मुल्ला यांच्या विजयाचे आवाहन केले. नड्डा पुढे म्हणाले, ओबीसींचे चॅम्पियन म्हणविणार्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काळात किती ओबीसी मंत्री होते, राजीव गांधी फौंडेशनमध्ये, काँग्रेस कमिटीमध्ये किती ओबीसी आहेत हे जाहीर करावेत, मोदी सरकारमध्ये 27 ओबीसी मंत्री असल्याचे सांगून त्यांनी गांधी यांच्या मोहब्बत कि दुकानात द्वेषाचे सामान विकले जात असल्याची टीका केली. संविधान हातात घेऊन ओरडत राहणार्या राहुल गांधी यांनी संविधानच वाचलेच नाही, कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माच्या आधारवर आरक्षण देता येणार नाही हे संविधानात लिहून ठेवले आहे.
काश्मीरमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी संविधानाने शपथविधी झाला असून आता पुन्हा 370 कलम लागू करण्याची भाषा काँग्रेस करीत आहे. तृष्टीकारणांतर्गत कर्नाटकात सरकारी टेंडर मध्ये 4 टक्के आरक्षण देऊ पाहत आहेत. मुंबईत मतांसाठी बांग्लादेशीयांना वसविले जात आहेत. याच मुंबईत 26 /11 हल्ला केला. त्यावेळी काँग्रेसची युपीए सरकार पाकिस्तानजवळ डोजियर घेऊन फिरत होते. त्या अतिरेकी कसाबला बिर्याणी खायला दिली. आमच्या सरकारने एअर स्ट्राईक करून अतिरेक्यांचा खात्मा केला. काँग्रेसवाला त्याचा पुरावा मागू लागले आहेत. अतिरेक्यांची माहिती मिळताच त्याचे आयुष्य फक्त दोन आठवड्याचे होते. आता एनडीए सरकार, मोदींना विरोध करता करता काँग्रेस देशाला विरोध करू लागली आहे, असा आरोप नड्डा यांनी काँग्रेसवर केला आहे.