महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांचा अंतिम टप्पा सुरु आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. आज महाराष्ट्रात कॉंग्रसचे नेते राहुल गांधी यांची अमरावतीच्या धामणगावात सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्रात विधानसभा निव़डणूकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचलेला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेचे मतदान होणार आहे.सोमवारी सायंकाळी महाराष्ट्रात प्रचाराची समाप्ती होणार आहे. केवळ 48 तासांत होणाऱ्या प्रचाराच्या आधारे कोणाचे सरकार महाराष्ट्रात येणार आहे याचा निकाल लागणार आहे. आज शनिवारी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अमरावतीच्या धामणगावात सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी आरोप केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात आहेत. आज जर डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी असते तर ते जातनिहाय जनगणनेच्या विरोधात असते का असा सवाल राहुल गांधी यांनी केला. ते नक्की जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात नसते असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
Published on: Nov 16, 2024 02:40 PM