मनसेची स्वबळावर 250 जागा लढण्याची तयारी:महाविकास आघाडी-महायुतीस चिंता, राज ठाकरेंच्या निशाण्यावर मोदी, शाह, शिंदे, ठाकरे अन् पवार

4 days ago 3
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने, निवडणुकीत मनसे महायुतीत सामील होणार का ? अशा चर्चा रंगल्या हेात्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. निवडणुकीत कोणाशी युती नको, कोणाशी आघाडी नको असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाची घोषणा केली. मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या मनसे मेळाव्यातून राज ठाकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकताना राज्यातील २८८ पैकी किती आणि कोणत्या जागा लढवणार यावर कोणतेही भाष्य केले नाही. २०१९ च्या निवडणुकीत मनसेने १०१ जागांवर उमेदवार उभे केले हेाते. मात्र, शिवसेनेच्या फुटीमुळे यंदाच्या निवडणुकीत २०० ते २५० जागांवर निवडणूक लढवण्याचा मनसेचा विचार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. एकीकडे महायुती, महाविकास आघाडी असा सामना रंगलेला असतानाच, दुसरीकडे मनसेचा स्वबळाचा नारा कुणाच्या पथ्यावर पडणार ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांना तुरुंगामध्ये टाकण्याऐवजी मंत्रिमंडळात स्थान राज ठाकरे म्हणाले, शरद पवार म्हणतात, पक्ष फोडला मग तुम्ही आयुष्यभर काय केले. १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता? अजित पवार भाजपमध्ये येण्याआधी मोदी म्हणतात, ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना जेलमध्ये टाकू. त्याऐवजी मंत्रिमंडळात टाकलं. हे का होतंय? उद्धव इतिहासातच रमले राज यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, आम्हाला सत्ता दिली तर महाराष्ट्र कधी दिल्लीपुढे झुकणार नाही असे म्हणत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर त्यांनी निशाणा साधला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर येत नाहीत. सारखे अब्दाली अफजलखान असे बोलत असतात, सारखे वाघ नखं काढत असतात. महाराष्ट्राबद्दल काहीतरी बोल असे म्हणत उध्दव ठाकरेंचा समाचार घेतला. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा “ पुष्पा’असा उल्लेख केला. करत त्यांची मिमिक्री केली. मी असा महाराष्ट्र कधी पाहिला नाही. येणाऱ्या पिढ्यांवर काय संस्कार करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील महिलांच्या हातांना काम द्या, फुकट पैसे नको लाडकी बहीण योजनेवरूनही राज ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारला फटकारले. लाडकी बहीण योजनेचे या महिन्याचे पैसे येतील, पुढच्या महिन्याचे येतील, नंतर पैसे येणार नाही. जानेवारी, फेब्रुवारीत राज्याकडे पगार द्यायला पैसे नसतील. महिलांच्या हातांना काम द्या, कामातून त्या पैसे उभे करतील. त्यांना सक्षम बनवा, असेही ते म्हणाले. अमित ठाकरेंसाठी मतदारसंघाची चाचपणी मनसेने मुंबईच्या ३६ पैकी २५ जागा लढविल्या होत्या. मनसेने मुंबईतील बोरीवली, जोगेश्वरी, चारकोप, मालाड पश्चिम, अंधेरी पूर्व, मानखुर्द, शिवाजीनगर वांद्रे पश्चिम, वरळी, भायखळा, मलबार हिल आणि कुलाबा या ११ मतदार संघात उमेदवार दिले नव्हते. मात्र यंदा वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेने संदीप देशपांडे यांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे राज ठाकरे ११ मतदार संघात उमेदवार देणार का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यंदा निवडणूक लढविण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे अमित ठाकरे लढणार असतील तर कोणता मतदार संघ सेफ असू शकतो याचीही चाचपणी सुरू असल्याचे समजते. मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. ते होऊ शकत नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे हे खरं बोलण्याचं धाडस फक्त राज ठाकरे करू शकतो. त्यामुळेच मी लोकांना परवडत नसेल असेही राज म्हणाले. समुद्रात पुतळा उभा करायचा असेल तर किमान १५ ते २० हजार कोटी खर्च करावे लागतील.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article