महायुतीच्या उमेदवाराने वर्ध्यात बोलावलेला अवैध विदेशी दारुसाठा जप्त:शेतकरी फरार, खासदार काळेंची कारवाईची मागणी
2 days ago
2
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार विजयी होण्यासाठी नवनवीन शक्कल लढवीत आहेत. आर्वी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवाराने चक्क मतदारांना प्रलोभने देण्यासाठी चक्क विदेशी दारु साठा बोलाविला आणि खासदार अमर काळे यांच्या समर्थकांनी तो अवैध दारु साठा पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धडपड केली. १७ लाख ८८ हजार रुपयांची दारु जप्त करीत शेत मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भाजप पदाधिकारी असलेली शेतकरी फरार आहेत. आर्वी विधानसभेचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांना डावलून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव यांना उमेदवारी देण्यात आल्याने, आर्वी विधानसभा क्षेत्रात मोठे वादळ उठले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दादाराव केचे यांची समजूत काढली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले महायुतीचे उमेदवार सुमित वानखेडे व खासदार अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवीत आहेत. त्या दोघांमध्ये आर्वी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात थेट लढत आहेत. उमेदवार मयुरा काळे यांचे पती खासदार अमर काळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव असलेले महायुतीचे उमेदवार सुमित वानखेडे या दोघांमध्ये बॅनरवरुन टीका टिपणी सुरु झाली होती. विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असल्याने मतदारांना प्रलोभने देण्यासाठी सुमित वानखेडे यांनी चक्क गांधी जिल्ह्यात दिनांक १८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास विदेशी दारु साठा बोलावून घेत, त्यांचे निकटवर्तीय असलेले अश्विन शेंडे यांच्या शिरपूर येथील शेतात तो अवैध दारु साठा ठेवण्यात आला होता. सोबतच तीन ते चार पोत्यात नगदी रक्कम सुद्धा होती. खासदार अमर काळेंच्या समर्थकांना माहिती मिळाली आणि दारु उत्पादन शुल्क, पोलिस विभाग व निवडणूक विभागाला काळेंनी पाचारण करीत घटनास्थळी बोलावून घेण्यात आले होते. तत्पूर्वी नगदी रक्कम घटनास्थळा वरुन लंपास करण्यात आली असे सांगितले जात आहेत. आर्वी पोलिस,वर्धेतील दारु उत्पादन शुल्क व निवडणूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर खासदार अमर काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, विदेशी दारुच्या १४९ पेट्या किंमत १७ लाख ८८ हजार रुपयांचा अवैध दारु साठा जप्त करण्यात आला. आर्वी पोलिसांनी भाजपाचे पदाधिकारी असलेले शेतकरी अश्विन शेंडे यांचे विरोधात गुन्हा दाखल केला असून, शेतकरी अश्विन शेंडे फरार असल्याचे पोलिस विभागाकडून सांगितले जात आहेत. याप्रकरणी उमेदवार असलेले सुमित वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता, थोड्या वेळात माहिती देतो असे सांगण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी- खासदार काळे
अश्वीन शेंडे हे भाजप उमेदवाराचे निकटवर्ती आहेत. त्यांनी मतदारांना प्रभावीत करण्याकरीता आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात दारु व करोडो रुपयाचा साठवा करुन ठेवला होता. पोलिसांच्या दिरंगाईमुळे रोकड हलविण्यात ते यशस्वी झाले. मात्र दारुचा साठा सापडला. ही दारु कुठून आणल्या गेली. कुणाच्या सांगण्यावरुन आणल्या गेली. कुणाकरीता आणल्या गेली. याकरीता वापरल्या गेलेले वाहन, पुरवठा करणाऱ्या परवाना धारक दुकानदाराचा शोध पोलिसांनी घेवून आरोपींवर कडक कारवाई करावी. तसेच याची दखल घेवून निवडणूक आयोगाने सुद्धा कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर काळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)