महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त नेत्ररोग तपासणी, रक्तदान शिबिर:महानगरात निघणार शोभायात्रा, अग्रवाल समितीचा पुढाकार

2 hours ago 2
सकल अग्रवाल समाजाचे आराध्य महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीची तयारी अग्रवाल समितीच्यावतीने प्रारंभ करण्यात आली आहे. या सोहळ्यात नेत्ररोग तपासणी, रक्तदान शिबिर, विविध कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विविध स्पर्धा होणार आहेत. महानगरात सकल अग्रवाल समाज अग्रसेन जयंती साजरी होणार आहे. या जयंती उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवार, २७ सप्टेंबरपासून अग्रसेन भावनात होणार आहे. अग्रवाल महिला मंडळातर्फे मेहंदी, पाककला, फुलांच्या पानांची रांगोळी, राम दरबार, फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. अग्रवाल नवयुवती मंडळाच्यावतीने किड्स मास्टर शेफ स्पर्धा व शिवनी (मध्यप्रदेश) येथील व्याख्याता मनीषा अग्रवाल महाराजा या अग्रसेनजी यांच्या जीवनावर व्याख्यान सादर करणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी पोलिस लॉन येथे जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून एलआयसीचे संचालक अनिल गुप्ता, सहाय्यक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल, अभिनेत्री ईशा अग्रवाल आदी उपस्थित राहणार आहेत. जयंतीनििमत्त राणी सती धाम येथून महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेची शोभायात्रा महानगरातून काढण्यात येणार आहे. या जयंती सोहळ्यात अग्रवाल समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व. गोकुलचंद रामधन गोयनका यांना मरणोत्तर समाजातील मानाचा अग्रविभूती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या उपक्रमात समाजाच्या महिला, पुरुष ,युवक, युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अग्रवाल समितीचे अध्यक्ष दीपक गोयनका, सचिव विनोद टोरका, अग्रसेन भवन ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल ,सचिव शैलेंद्र कागलीवाल, महाराजा अग्रसेन भवन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. डी.डी. तुलशान, महिला मंडळाच्या अध्यक्षा ममता अग्रवाल आदींनी केले आहे. नेत्ररोग तपासणी, रक्तदान शिबिरांचे आयोजन ः शनिवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी अग्रवाल नवयुवती मंडळाच्या वतीने अग्रसेन भवन येथे नेत्ररोग तपासणी शिबिर होणार आहे. यात नेत्र तज्ज्ञ डॉ. जुगल चिराणीया, डॉ. विजय खेतान, डॉ. राजेश मुरारका,डॉ. पूजा खेतान नेत्र तपासणी करणार आहेत. रविवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता अग्रवाल नवयुवक मंडळाच्यावतीने लहान मुलांसाठी ट्रायसिकल, लेमन रेस स्पर्धा, चॉकलेट शोधा स्पर्धा, संगीत खुर्ची व फुगे फोडा स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गुणवंतांचा सत्कार ः अग्रवाल नवयुवक मंडळाच्यावतीने जवाहर नगर परिसरातील महाराजा अग्रसेन भवनात आनंद मेळाचे आयोजन करण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अग्रसेन भवन, न्यू राधाकिशन प्लॉट येथे अग्रवाल समितीच्यावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता नवयुवती मंडळाच्यावतीने कॉमेडी शो विथ कॅरेक्टर, भाजी चिरणे, इंस्टाग्राम बनवणे व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. फुलबत्तीपासून रांगोळी निर्माण, भिंतीवर नवरात्री पूजा मांडणे आदी स्पर्धा होणार आहेत. महिलांसाठी विविध स्पर्धा, आरोग्य तपासणी १ ऑक्टोबरला अग्रवाल महिला मंडळातर्फे नवरात्री मटकी सजवा, मेकअप, पोस्टर निर्माण व महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सोबतच होमिओपॅथी शिबिर आयोजित केले असून, त्यामध्ये डॉ. प्रीती अग्रवाल, डॉ. आरती गोयनका, डॉ. अंजली अग्रवाल सोनालावाला आरोग्य तपासणी करणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article