महाविद्यालयीन तरुणी, शाळकरी मुली, महिलांना लागली कीर्तनाची गोडी:देगाव माऊली मंदिरात ११११ दिवस सलग हरी कीर्तन संकल्प, तयार होताहेत शेकडो महिला कीर्तनकार
4 hours ago
1
देगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात ११११ दिवस सलग हरि कीर्तन सोहळा सुरू असून आतापर्यंत ९१७ दिवस किर्तन पार पडलेत. जून २०२५ मध्ये हा संकल्प पूर्ण होईल. या सोहळ्यात दोन- अडीच वर्षापासून गृहिणी, महाविद्यालयीन तरूणी, युवती, शाळकरी मुलींना कीर्तनाची महिन्यातून एकदा संधी मिळतेय. सुमारे १५ महिला, ५ युवती, शाळकरी मुलींचा समावेश आहे. शाळकरी मुलेही पखवाज वाजवताहेत. डॉक्टर, वकील, शेतकरी भक्तीच्या मार्गावर येत हरिकीर्तनामुळे अनेकांच्या जीवनात भक्तीचा मळा फुलला आहे. घरात हरिपाठ, गाथा, ज्ञानेश्वरी पारायण, विष्णुसहस्रनामाचे पारायण सुरू असून मुलांवर चांगले संस्कार होत आहेत, भक्तीचा सोहळा वाढतोय. "ये साथीया आलीया, ओळंगा सारंग धरू, नाहीतरी संसारू जाईल वाया' संत माउलींच्या अभंगाप्रमाणे आपण जीवनात आल्यावर भक्ती नाही केली तर जीवन, संसार व्यर्थ जाईल. या अभंगाप्रमाणे अनेकजण भक्ती मार्गावर चालत आहेत. सोमवार, २० जानेवारी २०२५ ३ मार्च २०१५ साली ४४४ दिवस किर्तन सोहळा झााला, यानंतर ८ मार्च २०१७ सलग ४९५ तर २९ नोव्हेंबर २०१८ पासून ८५५ दिवस कीर्तने झाली. बारा ऑगस्ट २०२२ पासून ११११ दिवस कीर्तन सोहळ्याचा संकल्प सुरू आहे. भक्ती वाढावी, संस्कार चांगले व्हावेत ^प्रत्येकाच्या मनात भक्ती वाढावी. घरात, मुलांवर चांगले संस्कार व्हावेत. कुटुंबात एकोपा प्रेम राहावा. संताचे विचार रुजावेत हा उद्देश. माझे वडील बंडोबा लेंडवे जुनी मिल कामगार होते. १९४५ साली माऊली मंदिराची स्थापना केली. १९७७ नंतर सेवा माझ्याकडून माउलींच्या कृपेने सुरू आहे. अनेक किर्तनकार, प्रवचनकार, मृदूंग, पखवाज वादक तयार होताहेत. ज्यांना किर्तन करायचे आहे त्यांनी मंदिरात संपर्क करू शकता. - मुरलीधर लेंडवे, महाराज, माऊली मंदिराचे प्रमुख, देगाव सेवाभावी वृत्ती... शाळकरी मुलांचे पखवाज वादन अनेकांच्या घरात वारकरी संप्रदाय परंपरा आहे. ज्ञानेश्वरी, गाथा पारायण. हरिपाठ करतात. अभ्यास, मनन, चिंतन आहे. देगाव माऊली मंदिरात दररोज हरि कीर्तनामुळे अनेकांना संधी मिळाली. महिन्याकाठी एक किर्तन सेवा घडतेय. माळकरी भाविकांना कीर्तनाची संधी मंदिरात आहे. भाग्यश्री खंडागळे, मंगल काळे, जनाबाई शेळके, निर्मला मुसळे, अनुसया वराडे, प्रिया गुंड यांच्यासह १२ महिलांचा कीर्तनात सहभाग आहे. प्रगती गुंड, वैष्णवी माशाळ, साक्षी जाधव, वैभवी जाधव महाविद्यालयीन तरूणीचा सहभाग असून ओम माशाळ, रघुवीर शेळके ही मुले पखवाज वादन करतात. डॉ. गणेश इरकल, अॅड सिद्धेश्वर खंडागळे, अनेक शेतकरी व अन्य कीर्तनकार महाराजांची सेवा आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
महाविद्यालयीन तरुणी, शाळकरी मुली, महिलांना लागली कीर्तनाची गोडी:देगाव माऊली मंदिरात ११११ दिवस सलग हरी कीर्तन संकल्प, तयार होताहेत शेकडो महिला कीर्तनकार