माजी गृहमंत्री अनिल देशमुख हल्ल्याचे ‘एआय’च्या माध्यमातून केले ‘रिक्रिएशन’:हल्ला प्रकरणात अज्ञात 4 जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
1 day ago
1
राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात अज्ञात चार युवकांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री बेलफाटाजवळ झालेल्या दगडफेकीची घटना पोलिसांनी गंभीरतेने घेतली आहे. रात्रभर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. देशमुख यांच्यावर चौघांनी हल्ला केला होता व त्यानंतर ते भारसिंगीच्या दिशेने फरार झाले. पोलिसांनी मंगळवारी संबंधित घटनेचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून ‘रिक्रिएशन’ केले. तांत्रिक माध्यमातून तपासावर भर देण्यात येत आहे. देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक झाली तेव्हा ते समोर बसले होते. पोलिसांचे दोन सुरक्षा रक्षक मागच्या वाहनात होते. घटना घडली तेव्हा वाहनाची गती कमी होती. या वेळी चार जण समोर आले. त्यांनी फेकलेला साडेसात किलो वजनाचा दगड समोरील काचेवर पडला तर दुसरा दगड मागील दाराच्या खिडकीतून फेकून मारण्यात आला. तपासात ‘एआय’चा उपयोग आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक कशी झाली, याचे रिक्रिएशन करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून विविध शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. तसेच परिसरातील मोबाइल टॉवरच्या माध्यमातूनही परिसरात सक्रिय असलेल्या मोबाइल क्रमांकांचा डेटा एकत्रित करण्यात येत आहे. त्या परिसरात होत असलेल्या मोबाइल कॉल्सचा या माध्यमातून अभ्यास करण्यात येईल. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकानेदेखील सॅम्पल परीक्षणासाठी नेले आहेत, असे नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्पष्ट केले.
पुण्यात आघाडीस पाठिंबा दिल्याने माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत. चंद्रकांत टिंगरे व त्यांचा कारचालक सचिन गायकवाड मंगळवारी दुपारी एमएसईबी ऑफिसकडे जात होते. त्यांनी कार लावली आणि खाली उतरत असतानाच दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी प्रथम पाठीमागून कारवर दगड मारला. तेव्हा कारचालक घाईगडबडीत खाली उतरले व पाठीमागे गेले. त्याच वेळी समोरूनही सिमेंटचा गट्टू काचेवर कुणीतरी मारून तोडफोड केली. या दगडफेकीत चंद्राकांत टिंगरे हे जखमी झाले आहेत. बापूसाहेब पठारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रुग्णालयात टिंगरे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. रेखा टिंगरे यांनी २०२२ मध्ये भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर ४ महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु सहा दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आणि वडगावशेरीमध्ये आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला होता.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)