मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून डहाणू विधानसभेसाठी उमेदवार जाहीर:आमदार विनोद निकोलेंना पुन्हा संधी, सर्वात गरीब आमदार म्हणून महाराष्ट्राला परिचित

2 days ago 2
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून डहाणू विधानसभेसाठी विद्यमान आमदार विनोद निकोले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केली. यानंतर सर्वप्रथम माकपकडून निकोलेंना उमेदवारी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून सध्याचे डहाणू मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनोद निकोले हेच पुन्हा सिपीएम पार्टीचे डहाणू विधानसभेचे उमेदवार असणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कोण आहेत विनोद निकोले? संघर्षातून वर आलेला आमदार म्हणून डहाणूमध्ये विनोद निकोले यांची ओळख आहे आणि आजही ते कुदळ फावडं घेऊन बागेत काम करताना दिसतात. आमदार होण्यापूर्वी विनोद डहाणूत चहा आणि वड्यांचं दुकान चालवायचे. तिथेच त्यांची मार्क्सवादी विचारांशी ओळख झाली आणि ते पक्षाचं काम करू लागले. आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी लक्षावधी रुपयांचा खर्च करावा लागतो. राज्यातील बहुतांश उमेदवारांची खासगी मालमत्ता कोट्यवधींच्या घरात असली तरी त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार विनोद भिवा निकोले हे अपवाद आहेत. मालमत्तेच्या बाबतीत ते सर्वांत गरीब आमदार आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या डहाणू विधानसभा मतदारसंघातून माकपचे कॉम्रेड विनोद निकोले यांनी 2019 मध्ये भाजपच्या पास्कल धनारे यांचा चार हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. आदिवासींवरील अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढणाऱ्या निकोलेंना ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद अथवा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांनी भाजपचे मातब्बर उमेदवार धनारे यांचा पराभव करून थेट विधानसभा गाठली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article