मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल:देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान, म्हणाले - वरिष्ठांसोबत चर्चा सुरू

2 hours ago 1
मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल, असे फडणवीस म्हणाले. वरिष्ठांची चर्चा सुरू असून तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस एका लग्न समारंभानिमित्त बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत तसेच मंत्रिमंडळाबाबत भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही त्यांनी आपले मत मांडले. मुख्यमंत्री पदाबाबत लवकर उत्तर मिळेल मुख्यमंत्रीपदाबाबत तिनही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील. आमच्या श्रेष्ठींसोबत सगळ्यांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे याचे उत्तर लवकरच मिळेल, असे फडणवीस म्हणाले. पुढे ते म्हणाले. आधी मुख्यमंत्री ठरेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री इतर मंत्री ठरतील. मुख्यमंत्रिपदानंतर इतर मंत्र्यांची नावे समोर येतील. विरोधी पक्षांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांच्या ईव्हीएमवरील आरोपांवर प्रत्युत्तर देत निशाणा साधला. काल सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबत होत असलेल्या चर्चेबाबत उत्तर दिले आहे. तुम्ही हरले तर ईव्हीएम वाईट, ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टेम्परप्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत सुरूच राहणार आहे, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. मनपा निवडणुकीसंदर्भात बोलणे टाळले स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवायचे की नाही, हे आम्ही निर्णय घेऊ, त्याला अजून वेळ आहे, असे फडणवीसांनी सांगितले. पण महापालिका निवडणुकीसंदर्भात काहीही बोलणे त्यांनी टाळले. हे ही वाचा... भाजप स्वतः बहुमताच्या जादुई आकड्याजवळ:राष्ट्रवादीची शर्यतीतून माघार, मग महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे घोडे नेमके अडले कुठे? महाराष्ट्रात कुणाच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपला एकट्याला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्यात. विशेषतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यानंतरही महायुतीने आपला नवा कारभारी घोषित केला नाही. सूत्रांच्या मते, भाजप नेतृत्वाला जातीय समीकरणापासून एनडीएच्या सर्वच सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. यामुळेच गत 4 दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सविस्तर वाचा... देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा:छत्रपती संभाजीनगरच्या भाजप महिला पदाधिकाऱ्याने PM नरेंद्र मोदी यांना रक्ताने लिहिले पत्र विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देवाला साकडे घालण्यात येत आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील देव पाण्यात घालून ठेवल्याचे म्हटले जात आहे. त्यातच भाजपच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article