केज-बीड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.Pudhari Photo
Published on
:
27 Nov 2024, 11:30 am
Updated on
:
27 Nov 2024, 11:30 am
केज : केज तालुक्यातील कोरेगाव येथे कृषी पंप आणि गावातील सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. या मागणीसाठी शेतकरी आणि गावकऱ्यांनी आज (दि.२७) केज-बीड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
याबाबतची माहिती अशी की, कोरेगाव (ता. केज) येथे मागील चार ते पाच दिवसां पासून शेतातील कृषी पंपाची वीज सुरळीत नसून थोडा वेळ म्हणजे फक्त पाच ते दहा मिनिट वीज राहते आणि नंतर वीज जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. तसेच गावातील सिंगल फेज सुध्दा बंद आहे. यामुळे येथील संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करीत केज-बीड महामार्गावरील कोरेगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात दत्तात्रय नागरगोजे, अविनाश साबळे, रमेश तांदळे यांच्यासह शेतकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
गावात सलग चार ते पाच दिवसांपासून वीज नसल्याने पिकांना पाणी देण्याबरोबरच गावातील दळण-पाणी बंद आहे. यामुळे जर काही अनुचित प्रकार घडला. तर याची सर्वस्वी जबाबदारी वीज वितरण कार्यालयाची असेल.
- दत्तात्रय नागरगोजे