परभणी/पाथरी (Parbhani):- शॉर्टसर्किटने केबिनला आग लागल्यानंतर राज्य महामार्ग वर दोन दिवस बंद अवस्थेत राहिलेल्या आयशर ट्रक अपघाताला निमंत्रण देण्यास कारणीभुत ठरला असून या ट्रकला (Truck)धडकत झालेल्या. दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेमध्ये दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू (Death)झाला आहे.
शॉर्टसर्किटने आग लागून जळाले होते आयशर ट्रक
पाथरी तालुक्यात मागील ५ दिवसात सलग अपघाताच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दिवसा व बुधवारी रात्री दोन अपघाताच्या (Accident)विचित्र घटना घडल्या असून बंद अवस्थेत उभे असलेले एकाच वाहनावर वेगवेगळ्या वेळी दोन दुचाकी सर धडकले व यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटने संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सोमवार २५ नोव्हेंबर रोजी पाथरी तालुक्यातील राज्य महामार्ग ६१ वर सारोळा शिवारात आयशर ट्रक क्रमांक डीएल १ जीई ०९३५ आष्टीच्या दिशेने जात असताना सदरील ट्रक मध्ये शॉर्टसर्किट होत केबिनला आग लागली होती. यावेळी हे वाहन महामार्गावर सोडून चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान मंगळवार २६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एम एच २४ एसी ७१०५ वरून जात असलेला दुचाकीस्वार इसराईल शहानुर बेग (वय ३८ ) रा . उपळी ता .वडवणी जि. बीड हा रस्त्याच्या वर उभ्या असणाऱ्या ट्रक वर जाऊन धडकल्याने गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले होते.
घडलेला अपघात एवढा भीषण होता की, यावेळी दुचाकी ट्रक मध्ये अडकून राहिली
तर दुसरी घटना बुधवार २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दीड वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी घडली . पाथरी तालुक्यातील हादगाव येथील सुरेश भागवत शिंदे (वय २७ ) हा युवक त्याच्याकडील विना क्रमांकाच्या दुचाकीवरून हादगाव कडे जात असताना महामार्गावर बंद पडलेल्या याच आयशरला पाठीमागून बाजुने धडकला. घडलेला अपघात एवढा भीषण होता की, यावेळी दुचाकी ट्रक मध्ये अडकून राहिली व सदरील युवकाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान पहिल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचाही परभणी येथे उपचार सुरू असताना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. हादगाव येथील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी ठाण्यामध्ये गुन्हा (Crime) दाखल झाला असून पहिल्या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी उशिरापर्यंत ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता .