चोरीची घटना सिसिटीव्हीत कैद; होणार्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष
हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांनी आणलेल्या शेती मालावर यार्डातील काही छन्नेवाल्यांकडुन डल्ला मारला जात असल्याचा प्रकार सिसिटीव्हीमध्ये कैद झाल्याने यावर (Hingoli Bazar Samiti) बाजार समितीकडुन कोणती कारवाई केली जाते, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणत असतात. हा शेतीमाल यार्डामध्ये मोकळा टाकल्यानंतर त्यांचा लिलाव केला जातो. यार्डामध्ये काही छन्नेवाले कार्यरत आहेत. अशावेळी काही छन्नेवाले शेतकर्यांची नजर चुकवून त्यांचा शेतीमाल चोरुन नेत असल्याच्या घटना यापुर्वी घडल्या होत्या. परंतु अशीच एक चोरीची घटना सिसिटीव्ही कॅमेर्यामध्ये वैâद झाल्याने शेतकर्यांतुन संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे (Hingoli Bazar Samiti) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांच्या शेती मालाला यापुर्वीच चांगला भाव मिळत नसताना आता तेथील छन्नेवाले डल्ला मारत असल्याने बाजार समितीकडुन त्यावर कोणती कारवाई केली जाते. याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.