परभणी (Parbhani):- विवाहितेचा शारिरीक, मानसीक छळ करत तीन तलाक देण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर २६ नोव्हेंबरला पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती, सासरच्या मंडळीवर परभणीच्या पालम पोलिस ठाण्यात नोंद
रेशमा शेख या विवाहितेने तक्रार दिली आहे. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले नांदविल्यावर टेलरचे दुकान टाकण्यासाठी माहेराहुन १ लाख रुपये घेवून ये असे म्हणत विवाहितेचा छळ (torture) करण्यात आला. याच दरम्यान पतीने विवाहितेला तीन तलाक दिला. सदर प्रकरणी मुसा शेख, सुरय्या शेख, जावेद शेख, प्रणाली शिंदे यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.ह. बळवंते करत आहेत.