मुंबई पोलिसांनी सुरू केले ‘ऑपरेशन मुस्कान 13’; अपहरण आणि हरवलेल्यांचा शोध घेणार, वाचा सविस्तर…

2 hours ago 1

मुंबई शहरामधून गेल्या काही महिन्यांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे आणि तरुण-तरुणींचे अपहरण झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच हरवलेल्यांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान 13’ ही शोध मोहिम आणि 18 वर्षांवरील महिलांना शोधण्यासाठी विशेष शोध मोहिमेचे आयोजन केले आहे. नागरिकांनी सुद्धा या शोध मोहमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

मुंबई पोलिसांच्या माध्यामातून राबवण्यात येणारी ही विशेष शोध मोहिम 1 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत पार पडणार आहे. या कालावधीमध्ये मुंबई शहरातून हरवलेली अल्पवयीन मुले आणि 18 वर्षांवरील महिलांना शोधण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार आहेत. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी मुंबईमधील नागरिकांनी पोलीस/बालकांसंदर्भात काम करणाऱ्या विविध अशासकीय संस्थांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेण्यास मदत होईल. आपल्या परिसरामध्ये संशयास्पद लहान बालके सापडली किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास माहिती संबंधीत विभागांना देवून सदरचा उपक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

संशयीत अल्पवयीन मुले सापडल्यास त्यांच्याकडे चौकशी करावी व काही संशयीत वाटल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 किंवा 1098 या क्रमांकावर कळवावे किंवा लगतच्या पोलीस ठाण्यासी संपर्क साधावा. तसेच सदर बालकास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन जावे. 1 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यावर भिक मागणारे अथवा कचरा गोळा करणारी लहान मुले/मुली, धार्मिकस्थळे, रुगणालये, हॉटेल्स, दुकाने, आपण राहत असलेल्या परिसरात, नातेवाईकांकडे कोणीही संशायस्पद आढळल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाश 100 किंवा 1098 या क्रमांकावर कळवावे किंवा लगतच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. त्याच बरोबर एखादा अल्पवयीन मुलगा/मुलगी संशयीत वाटल्यास त्याबाबत https://missionvatsalya.wcd.gov.in या बेवसाईटवर जावुन khoya paaya या पोर्टलवर पीडितांचे फोटो अपलोड करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article