राजकीय उलथापालथीचे संकेत
हिंगोली (Shinde Shiv Sena) : विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले दोन नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मजबुत अपक्ष उमेदवारांची संख्या हिंगोली विधानसभेत होती. यापैकी दोन उमेदवार लवकरच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत (Shinde Shiv Sena) प्रवेश घेणार असल्याची सध्या हिंगोलीत जोरदार चर्चा आहे.
राज्यभर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तिन्ही पक्षांची मोठी वाताहत झाली. पुढील पाच वर्षांत राज्यात महायुतीचेच सरकार राहणार असल्यामुळे आता अनेक नेत्यांची चलबिचल सुरू झाली आहे. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवता यावे म्हणून काही नेते हा पावित्रा घेत आहेत.
सरकार स्थापनेनंतर होईल प्रवेशावर चर्चा- आ. संतोष बांगर
जिल्ह्यातील अनेक पुढार्यांनी पक्षात प्रवेशा बाबत तयारी दर्शविली असल्याचे सांगून याबाबत सरकार स्थापनेनंतर चर्चा होईल, अशी माहिती जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे.