मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा:न्यू इंग्लिश स्कूलचा विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक

5 days ago 3
महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानामध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे’ या शाळेने विभागीय पातळीवर अ व ब वर्ग महापालिका खासगी शाळा गटात प्रथम क्रमांक पटकावून २१ लाखांचे पारितोषिक मिळवले आहे. नागपूरच्या सरस्वती विद्यालयाला दुसरा तर पुण्याच्या श्री शिवाजी मराठा हायस्कूल शाळेला तिसरा क्रमांक मिळाला शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता राव, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, शाला समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन या स्पर्धेसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले. या प्रयत्नांना या पुरस्काराच्या रूपाने यश आले. कृत्रिम तारांगण असलेली आशिया खंडातील एकमेव शाळा, अवकाश निरीक्षणासाठी वेधशाळेची सोय, ३७हजार पुस्तकांचे भव्य ग्रंथालय, इंग्रजी भाषा प्रयोगशाळा, गणित खेळघर, भव्य प्रयोगशाळा, भव्य मैदान, जगभरातील १२५ खनिजांचे भूवस्तूसंग्रहालय, दुर्मीळ दिव्यांचे संग्रहालय अशी या शाळेची वैशिष्ट्ये आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत योगदान दिलेल्या या शाळेने इतिहास घडविला अगदी सामान्य घरांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून शिक्षण देऊन, त्यांचा सर्वांगीण विकास करून, समाजामध्ये, विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवून समाजाची सेवा करण्यासाठी चांगले नागरिक घडविणाऱ्या या शाळेच्या आजपर्यंतच्या प्रयत्नांना महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली ही शाबासकीची थाप आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या उल्लेखाशिवाय भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा, मराठी साहित्याचा आणि मराठी व्याकरणाचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. अशा या शाळेमधील विविध उपक्रमांच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य शाळेमधून व्याख्याने, क्षेत्रभेटी यांचे आयोजन करून सतत केले जाते. पर्यावरण संवर्धनासाठी शाळेतील विद्यार्थी स्वयंसेवक पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवतात. विद्यार्थी दर शनिवारी सभा घेऊन पुढील आठवड्यात करायच्या कामाची रूपरेषा ठरवतात. विद्यार्थी स्वत:च्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करून इको ब्रिक्स तयार करतात. या ब्रिक्स सामाजिक संस्थांना देतात. शाळेच्या इमारतीभोवती असणाऱ्या वृक्षांची देखभाल विद्यार्थी करतात. याशिवाय शाळेबाहेर जाऊन टेकड्यांवरही वृक्षारोपण केले जाते. स्वतः तयार केलेले सीडबॉल विविध ठिकाणी जाऊन टाकतात.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article