यंदाची विधानसभा आदित्य ठाकरेंसाठी ठरणार टफ:वरळीत भाजपकडून शायना एनसी तर मनसे अमित ठाकरेंना उतरणार रिंगणात?

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या चाचपणीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी मतदारसंघातही भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. अशात भाजप नेत्या शायना एनसी यांची आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्याची इच्छा असल्याची माहिती आहे. भाजपने शायना एनसी यांना तिकीट दिले तर वरळीत हायप्रोफाईल सामना पहायला मिळणार आहे. दुसरीकडे मनसेकडून अमित ठाकरे हे देखील वरळीतून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनाही तिकीट मिळाल्यास आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही विधानसभा टफ जाणार असल्याची शक्यता आहे. वरळी विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर ठाकरे गटाचे या गटातील वजन कमी झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मनसे यांनीही वरळीतून उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेत्या शायना एनसी यांनी आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजप नेते शायना एनसी यांना तिकीट देता का? हे पहावे लागणार आहे. भाजपने शायना यांची पूर्ण केल्यास वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एनसी यांच्या लढत होईल. कोण आहे शायना? शायना एनसी या भाजपच्या नेत्या असून व्यवसायाने फॅशन डिझायनर देखील आहेत. तर शायना यांचे वडील नाना चूडासामा हे मुंबई शहराचे माजी शेरीफ होते. अमित ठाकरेही मैदानात? दुसरीकडे, मनसेही यंदाच्या विधानसभा निवडणुकीला वरळी मतदारसंघात आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. गत विधानसभा निवडणुकीत मनसेने वरळीतून आपला उमेदवार उभा केला नव्हता. मात्र यंदा राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि आदित्य ठाकरे यांचे चुलत भाऊ अमित ठाकरे हे वरळी विधानसभा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. जर महायुती आणि मनसेने वरळी मतदारसंघात उमेदवार दिला तर आदित्य ठाकरेंसाठी यंदाची निवडणूक अवघड ठरणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदार संघाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुती कुणाला उमेदवारी देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शायना एन सी यांची उमेदवार म्हणून चाचपणी करताना महायुतीच्या नेत्यांनी सर्वकष विचार करून त्यांची निवड करतील, असे म्हटले जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article