राष्ट्रवादीच्या कोट्यात तीन जागा असत्या तर मी आमदार झाले असते:दीपक मानकरांच्या आरोपांवर रूपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर

2 hours ago 1
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या कार्यकर्ती 24 तास तुमच्यासोबत असतात म्हणून तुम्ही त्यांचीच बाजू घेणार का, असा सवाल अजित पवारांना करत रुपाली चाकणकरांवर टीका केली होती. यावर रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मानकरांना शहराध्यक्ष पद देताना मी भगिनी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे होते, पण त्यांनी असे का केले मला माहीत नाही, असे रूपाली चाकणकर यांनी म्हटले. राष्ट्रवादीच्या कोट्यात तीन जागा असत्या तर मी आमदार झाले असते, असेही त्यांनी सांगितले. विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या निवडीनंतर अजित पवार गटातील पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपली नाराजी व्यक्त करत शहराध्यक्ष पदाचा राजीनाम दिला. यावर रूपाली चाकणकर म्हणाल्या, मानकर यांनी असे केले माहीत नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीन जागा आल्या असत्या, तर महिला म्हणून मला आमदारकी मिळाली असती. मला तशी अपेक्षा होती आणि मी मागणी देखील केली होती. परंतु, दोनच जागा आम्हाला मिळाल्या. पुढच्या वेळेला माझा विचार केला जाईल, असे सांगत रुपाली चाकणकर यांनी आपली इच्छा व्यक्त केली. तसेच महिला आयोगाचे अध्यक्ष पद मला परत दिल्याने महायुती सरकारचे आभार मानते, असेही त्यांनी म्हटले. काय म्हणाले होते दीपक मानकर? राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी न दिल्याने अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी 600 जणांना सोबत घेत राजीनामा दिला होता. सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल तत्परता दाखवली, ती आमच्याबद्दल का दाखवली नाही, असा प्रश्न देखील दीपक मानकर यांनी उपस्थित केला. आम्हाला का संधी मिळाली नाही, रूपाली चाकणकरांनाच सातत्याने संधी का मिळते, त्या कार्यकर्तीला तुम्ही ताकद देता, 24 तास तुमच्यासोबत असतात म्हणून तुम्ही त्यांचीच बाजू घेणार का, आम्हाला का नाही विचारणार, असे म्हणत दीपक मानकर यांनी रूपाली चाकणकरांवर टीका केली होती. हेही वाचा... महादेव जानकरांचा पहिला उमेदवार बारामतीतून?:शरद पवारांच्या विरोधात घेतली होती 1 लाख मते, आता अजितदादांना आव्हान? कोणाचा फायदा, कोणाचे नुकसान? राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर बारामतीत उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या यादीत बारामतीच्या उमेदवाराचे नाव असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जानकर यांच्या पक्षाची 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी निवडणुकीसाठी युतीविरोधातच दंड थोपटले आहेत. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article