Vande Bharat Train: भारतीय रेल्वेची सर्वात प्रसिद्ध झालेली वंदे भारत ट्रेनला मागणी वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणांवरुन वंदे भारत ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे. परंतु काही ट्रेनला प्रवासी मिळत नाही. त्यात महाराष्ट्रातून धावणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे. यामुळे 20 कोचची ट्रेन 8 कोचमध्ये बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत. नागपूरवरुन सिकंदराबाद जाणारी ही ट्रेन आहे. या ट्रेनला 25% पेक्षाही कमी ऑक्यूपेंसी आहे.
असा पाठवला प्रस्ताव
नागपूरवरुन सिकंदराबाद ट्रेनला 20 कोच आहेत. परंतु प्रवासी मिळत नसल्याने तिला 8 कोचची करण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. वंदे भारत ट्रेनची नवीन खेप आल्यावर तिला बदलण्यात येणार आहे. ही ट्रेन 8 कोचची करण्यात येणार आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या आठ दिवसांचा कालावधी वगळला तर ही ट्रेन पूर्ण ऑक्यूपेंसीने सुरु झाली नाही. यामुळे ही ट्रेन दोन भागांत करण्याचा प्रस्ताव मुंबई मुख्यालयात पाठवण्यात आल्याची माहिती नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
वंदे भारत ट्रेनची नागपूरवरुन सुटण्याची वेळ सकाळी पाच ऐवजी सात वाजता करण्यात येत आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी सांगितले की, सध्या सुरु असलेल्या वंदे भारतच्या रेक बदलण्याचा प्रस्ताव आहे. कोच वेगळे करता येत नाही, त्यामुळे तिला आठ कोचमध्ये करण्यात येणार आहे. गरजेनुसार त्यात वाढही करण्यात येणार आहे.
हे सुद्धा वाचा
कोच असे करण्याची योजना
वंदे भारत ट्रेन प्रवाश्यांच्या संख्येनुसार 8, 16 किंवा 20 कोचमध्ये आहे. नागपूर-सिकंदराबाद ट्रेनमध्ये प्रवासी मिळत नसल्यामुळे तिला 8 कोचचा चांगला पर्याय आहे. 16 कोच असणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये दोन एग्जीक्यूटिव्ह क्लास कोच आणि 14 चेअर कार कोच आहे. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनमध्ये 20 रेक आहे. त्यातून 1,440 प्रवासी प्रवास करु शकतात. ज्या मार्गावर जास्त प्रवाशी आहे, त्या मार्गावर 20 रेक असणारी ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. उर्वरित मार्गावर प्रवाशांच्या संख्येनुसार ट्रेनचे कोच असतील, अशी योजना आहे.